अचानक सोन्याच्या भावामध्ये मोठा बदल? ग्राहकांनो 24 आणि 22 कॅरेट चे नवीन दर एकदा पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

24 carat gold rates : नवीन वर्ष 2026 उंबरठ्यावर येऊन ठेपलं असतानाच सोनं-चांदीच्या दराबाबत एक मोठ अपडेट आपल्या हाती आलेली आहे. मागील गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या दरांनंतर आज सोमवार, 29 डिसेंबर रोजी सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये घसरण नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे लग्नसराई, कार्यक्रम किंवा गुंतवणुकीसाठी सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर बाजारात जाण्यापूर्वी आजचे ताजे दर जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे. सोन्याचे योग्य तर जाणून घेण्यासाठी खालील दिलेल्या लेख वाचणे आवश्यक आहे. 24 carat gold rates

सोमवारी सकाळी सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 41 हजार रुपयांच्या पुढे, तर चांदीचा भाव 2 लाख 58 हजार रुपये प्रति किलो इतका नोंदवण्यात आला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या आकडेवारीनुसार, आज 22 कॅरेट सोन्याचा दर 1,30,005 रुपये, 24 कॅरेटचा दर 1,41,860 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा दर 1,06,330 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे.

आज विविध शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याचा दर पाहिला तर दिल्ली आणि जयपूरमध्ये तो 1,06,330 रुपये आहे, तर कोलकाता आणि मुंबईत 1,06,280 रुपये इतका आहे. इंदूर-भोपाळमध्ये 1,06,330 रुपये दर कायम असून, दक्षिण भारतात चेन्नई येथे 18 कॅरेट सोनं तुलनेने महाग म्हणजेच 1,08,650 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे.

22 कॅरेट सोन्याबाबत बोलायचं झालं, तर भोपाळ आणि इंदूरमध्ये आज 1,29,950 रुपये दर आहे. दिल्ली, जयपूर आणि लखनऊमध्ये 1,30,050 रुपये दर नोंदवण्यात आला आहे. हैदराबाद, केरळ, कोलकाता आणि मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर 1,29,900 रुपये इतका आहे.

तर 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर भोपाळ-इंदूरमध्ये 1,41,760 रुपये आहे. दिल्ली, जयपूर, लखनऊ आणि चंदीगडमध्ये 1,41,860 रुपये दर असून, हैदराबाद, केरळ, बेंगळुरू आणि मुंबईत 1,41,710 रुपये प्रति 10 ग्रॅम दर आहे. चेन्नईत मात्र सोनं थोडं महाग असून तिथे 24 कॅरेटचा दर 1,42,040 रुपये आहे.

चांदीच्या किमतींबाबत सांगायचं झालं, तर 29 डिसेंबर 2025 रोजी दिल्ली, मुंबई, जयपूर, कोलकाता, अहमदाबाद आणि लखनऊ येथे चांदीचा दर 2,58,000 रुपये प्रति किलो आहे. मात्र दक्षिण भारतातील बाजारात चांदी अधिक महाग दिसत असून, चेन्नई, मदुरै, विजयवाडा, विशाखापट्टणम, हैदराबाद आणि केरळमध्ये चांदीचा दर तब्बल 2,81,000 रुपये प्रति किलो इतका आहे. भोपाळ आणि इंदूरमध्येही चांदीचा दर 2,58,000 रुपयेच आहे.

दरम्यान, सोनं-चांदीच्या दरांमध्ये होणाऱ्या चढ-उतारामागे अनेक कारणं आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली, डॉलरमधील बदल, जागतिक आर्थिक अनिश्चितता, भू-राजकीय तणाव, केंद्रीय बँकांची खरेदी, व्याजदर आणि भारतातील आयात शुल्क यांचा थेट परिणाम सोनं-चांदीच्या किमतींवर होतो. त्यातच लग्नसराई आणि सणासुदीच्या काळात मागणी वाढल्यामुळे दरांमध्ये बदल दिसून येतो.

सोनं खरेदी करताना शेतकरी, सामान्य ग्राहक किंवा गुंतवणूकदारांनी एक गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. IBJA कडून जाहीर होणारे दर हे GST, TCS आणि मेकिंग चार्जशिवायचे असतात, त्यामुळे प्रत्यक्ष खरेदीवेळी दर थोडेफार वेगळे असू शकतात. सोनं घेताना नेहमी BIS हॉलमार्क आणि HUID नंबर तपासावा. 24 कॅरेट सोन्यावर 999, 22 कॅरेटवर 916 आणि 18 कॅरेटवर 750 असा शुद्धतेचा ठसा असतो.

एकूणच, सलग वाढीनंतर आज सोनं-चांदीच्या दरात थोडी घसरण दिसत असली, तरी बाजार अजूनही अस्थिर आहे. त्यामुळे खरेदीपूर्वी स्थानिक सराफा बाजारात दरांची खात्री करूनच निर्णय घेणं फायद्याचं ठरणार आहे.

( Disclaimer: वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे योग बाजार भाव जाणून घेण्यासाठी आपल्या जवळच्या सराफ दुकानाशी संपर्क साधा.)

हे पण वाचा | सोयाबीन बाजार भाव झाला मोठा बदल; आजचा सोयाबीन बाजार भाव पहा

Leave a Comment