Gold Price Today : सोनं आणि चांदी खरेदी करण्याची वाट पाहणाऱ्या ग्राहकांसाठी आजचा दिवस खऱ्या अर्थाने दिलासा देणारा ठरला आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेले सोन्याचे दर अखेर खाली आले असून आज सोन्याच्या दरवाढीला ब्रेक लागलेला पाहायला मिळत आहे. आज २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट अशा सर्व प्रकारच्या सोन्याच्या दरात लक्षणीय घसरण झाली आहे. त्यामुळे लग्नसराई, सणासुदी किंवा गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात मोठी घट नोंदवली गेली आहे. २४ कॅरेटच्या एका तोळ्याच्या दरात तब्बल ७१० रुपयांची घसरण झाली असून आज एक तोळा २४ कॅरेट सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना १ लाख ४१ हजार ७१० रुपये मोजावे लागणार आहेत. विशेष म्हणजे, १० तोळे सोनं घेतल्यास थेट ७१०० रुपयांची बचत होत आहे. आज १० तोळे २४ कॅरेट सोनं खरेदीसाठी १४ लाख १७ हजार १०० रुपये खर्च येणार आहेत.
२४ कॅरेटपाठोपाठ २२ कॅरेट सोन्याच्या दरातही घसरण झाली असून आज एक तोळा २२ कॅरेट सोनं ६५० रुपयांनी स्वस्त झालं आहे. आज २२ कॅरेटच्या एका तोळ्याचा दर १ लाख २९ हजार ९०० रुपये इतका आहे. तर १० तोळे सोनं खरेदी करणाऱ्यांना तब्बल ६५०० रुपयांचा फायदा होत असून आज १० तोळे २२ कॅरेट सोनं १२ लाख ९९ हजार रुपयांना मिळत आहे. दर घसरल्यामुळे आज सोनं खरेदी करण्यासाठी सुवर्णसंधी निर्माण झाली आहे.
दरम्यान, १८ कॅरेट सोन्याच्या दरातही आज मोठी घट दिसून आली आहे. आज १८ कॅरेटच्या एका तोळ्याच्या दरात ५४० रुपयांची घसरण झाली असून एक तोळा १८ कॅरेट सोनं आज १ लाख ६ हजार २८० रुपयांना उपलब्ध आहे. १० तोळे १८ कॅरेट सोनं घेतल्यास आज ५४०० रुपयांची बचत होत असून यासाठी १० लाख ६२ हजार ८०० रुपये खर्च येणार आहेत. त्यामुळे कमी बजेटमध्ये सोनं खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी हा चांगला पर्याय ठरत आहे.
सोन्याबरोबरच आज चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे आज सोन्यासोबत चांदी खरेदी करण्यासाठीही चांगली संधी निर्माण झाली आहे. आज १ ग्रॅम चांदीच्या दरात ४ रुपयांची घट झाली असून एक ग्रॅम चांदी आज २५८ रुपयांना मिळत आहे. विशेष म्हणजे, १ किलो चांदी आज तब्बल ४ हजार रुपयांनी स्वस्त झाली असून १ किलो चांदीसाठी आज २ लाख ५८ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. Gold Price Today
एकूणच पाहता, सोनं-चांदीच्या दरात झालेली ही घसरण सामान्य ग्राहकांसाठी दिलासादायक ठरली आहे. सतत वाढणाऱ्या दरांमुळे जे ग्राहक खरेदी पुढे ढकलत होते, त्यांच्यासाठी आजचा दिवस योग्य मानला जात आहे. पुढील काही दिवस दर कसे राहतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागले असले तरी सध्या तरी सोनं-चांदी खरेदीसाठी वातावरण अनुकूल असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे.