आनंदाची बातमी! लाडक्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याचे 1,500 रुपये जमा होण्यास सुरुवात..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Majhi Ladki Bahin Yojana: नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या लाडक्या बहिणींना महाराष्ट्र सरकारकडून दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात अखेर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा १५०० रुपयांचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, ही रक्कम १ जानेवारीची वाट न पाहता ३१ डिसेंबर रोजीच लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवण्यात आली.

राज्यात महिला सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आज अनेक कुटुंबांसाठी आधारवड ठरत आहे. महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. मात्र नोव्हेंबर महिन्याचा हप्ता रखडल्याने अनेक महिलांमध्ये नाराजी होती. डिसेंबर महिना संपत आला तरी पैसे न आल्याने शंका-कुशंका व्यक्त केल्या जात होत्या. अखेर वर्षाच्या शेवटच्या दिवशी सरकारने हप्ता जारी करत महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला आहे.

दरम्यान, या योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. राज्यात जवळपास अडीच कोटी महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत. यापैकी आतापर्यंत सुमारे १ कोटी ६० लाख महिलांनी केवायसी पूर्ण केली असून, अजूनही ३० ते ४० लाख महिलांची केवायसी प्रलंबित आहे. ज्यांनी वेळेत ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, त्यांना पुढील काळात हप्त्यापासून वंचित राहावे लागू शकते, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

लाडक्या बहिणींसाठी आणखी एक मोठी संधी

लाडकी बहीण योजना केवळ मासिक आर्थिक मदतीपुरती मर्यादित राहिलेली नाही. आता महिलांना स्वतंत्र व्यवसायासाठी ३ ते २५ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यासाठी महिलांनी बचत गट स्थापन करणे आवश्यक आहे. एक वर्ष पूर्ण केलेल्या बचत गटाला आधी दीड लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. हे कर्ज वेळेत फेडल्यानंतर रक्कम वाढवून तीन लाखांपर्यंत दिली जाते.

आता सरकारकडून या कर्जमर्यादेत मोठी वाढ करण्यात येणार असून, कोणतीही गॅरंटी न देता तब्बल २५ लाखांपर्यंत कर्ज मिळू शकणार आहे. बचत गटाने सुरू करावयाच्या व्यवसायाचा कृती आराखडा बँकेत सादर केल्यानंतर हे कर्ज मंजूर केले जाईल. यामुळे ग्रामीण भागातील महिलांना स्वतःचा व्यवसाय उभारण्याची, रोजगार निर्माण करण्याची आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची मोठी संधी मिळणार आहे.

एकीकडे महागाईचा ताण आणि दुसरीकडे घरखर्चाची जबाबदारी असताना, लाडकी बहीण योजना अनेक महिलांसाठी आशेचा किरण ठरत आहे. वर्षाच्या शेवटी मिळालेला हा हप्ता आणि आगामी कर्जसुविधा, नव्या वर्षात महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणारी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. Majhi Ladki Bahin Yojana

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment