Astrology News Today Marathi | ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाची चाल बदलली की, त्याचं पडसाद आपल्या आयुष्यावर उमटतात. पण जेव्हा ग्रहांचा राजा ‘सूर्य’ आपली जागा बदलतो, तेव्हा हालचाली जरा जास्तच वाढतात. सूर्य म्हणजे तेज, प्रतिष्ठा आणि यशाचा कारक! ज्याच्या कुंडलीत सूर्य प्रबळ, त्याच्या आयुष्यात सुखाचा सूर्योदय झालाच म्हणून समजा.
आता पुन्हा एकदा सूर्याने आपली कंबर कसली आहे. पंचांगानुसार, येत्या १३ फेब्रुवारीला पहाटे ४ वाजून १४ मिनिटांनी सूर्यदेव कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे, कुंभ राशीचा मालक शनिदेव आहे आणि महाशिवरात्रीच्या अगदी काही दिवस आधी हे राशी परिवर्तन होत आहे. याचाच अर्थ, भगवान शंकराच्या आशीर्वादाने काही राशींच्या नशिबाचे टाळे आता उघडणार आहेत.
पाहूया कोणत्या आहेत त्या नशीबवान राशी:
मेष रास (Mesh Rashi):
मेष राशीच्या लोकांसाठी सूर्याचा हा प्रवास अत्यंत गोड फळं देणारा ठरेल. गेल्या काही दिवसांपासून पैशांची जी ओढाताण सुरू होती, ती आता संपणार आहे. अडकलेली कामं मार्गी लागतील आणि तुमचा आत्मविश्वास गगनाला भिडेल. नोकरीत प्रमोशनची स्वप्नं पाहणाऱ्यांना आनंदाची बातमी मिळू शकते. नव्या वर्षात नव्या संधी तुमची वाट पाहत आहेत.
सिंह रास (Singh Rashi):
सिंहाचा स्वभावच राजेशाही असतो आणि आता सूर्यदेवाची साथ मिळाल्याने तुमच्या वैभवात आणखी भर पडणार आहे. व्यवसाय करणाऱ्यांना मोठा नफा होण्याची शक्यता आहे. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना हवी तशी नोकरी मिळेल. वडिलांशी असलेले जुने वाद मिटतील आणि घरात आनंदाचं वातावरण राहील.
मकर रास (Makar Rashi):
मकर राशीच्या लोकांसाठी तर हा काळ म्हणजे ‘छप्पर फाडके’ देणारा ठरेल. अचानक धनलाभाचे योग आहेत. खूप दिवसांपासून एखादी वस्तू किंवा वाहन खरेदी करायचं स्वप्न असेल, तर ते आता पूर्ण होईल. कुटुंबासोबत सहलीचे योग येतील आणि समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल.
कुंभ रास (Kumbh Rashi):
सूर्य तुमच्याच राशीत प्रवेश करत असल्याने त्याचा सर्वात जास्त प्रभाव तुमच्यावर दिसेल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. गुंतवणुकीसाठी हा काळ अतिशय उत्तम आहे. जर तुम्ही जमीन किंवा सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर हातात घेतलेल्या कामात यश नक्की मिळेल.
एकंदरीत, सूर्याचं हे परिवर्तन अनेकांच्या आयुष्यात नवी उमेद घेऊन येणार आहे. तुमची रास यापैकी एक असेल, तर संधीचं सोनं करायला विसरू नका!