Cotton Rate : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज समोर आलेले आहे, ती म्हणजे बाजार भावाबाबत गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांवरती मोठा संकटाचा काळ कोसळला होता शेतीला केलेल्या खर्चही निघत नव्हते सर्व पिकांचे सारखेच हाल. त्यामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे नैसर्गिक संकटांना सामोरे कधी मुसळधार पाऊस कधी अतिवृष्टी तर कधी अवकाळी पाऊस तर कधी पूर परिस्थिती अशामुळे शेतकरी हातबल झालेला होता. यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या देखील खूप मोठी आहे. मराठवाड्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात तर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये याच पिकावरती संपूर्ण शेतकऱ्यांच्या अर्थकारण अवलंबून आहे. योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पुढच्या वर्षी कपास लागवड करावे का असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांमध्ये उपस्थित झालेला आहे. Cotton Rate
परंतु शेतकऱ्यांनो सध्या तुमच्यासाठी एक गोड बातमी आपल्या हाती लागलेली असून नक्कीच तुम्हालाही दिलासादारी ठरणार आहे कारण केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक हातभार लागण्याची शक्यता आहे.
आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने कपास वरील आयात शुल्क पुन्हा लागू केल्याने देशांतर्गत बाजारांमध्ये थेट हालचाली सुरू झालेला आहे. एक जानेवारी 2026 पासून कापसावर पुन्हा 11% आयात शुल्क लागू करण्यात आलेला आहे याचाच परिणाम लगेच बाजारावरती दिसून आलेला असून योग्य दोन दिवसांमध्ये प्रतिक्विंटल सुमारे दोनशे रुपयांची वाढ झालेली आहे.
खरे तर या आधी वस्त्रोद्योगाच्या दबावामुळे केंद्र सरकारने कापसावरील आयात शुल्कतात पूर्त स्वरूपात माफ केलं होतं परंतु 31 डिसेंबर 2025 पर्यंत आयात शुल्क शून्य होतं त्यामुळे परदेशातून मोठ्या प्रमाणात स्वस्त कापूस आयात केला जायचा त्याचा फटका देशातील शेतकऱ्यांना बसत होत. परंतु बाजार भाव अपेक्षाप्रमाणे वाढलेच नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराज होती.
आता मात्र आयात शुल्क पुन्हा लागू झाल्याने परिस्थिती बदलताना दिसतेय. नव्या शुल्कामध्ये १० टक्के बेसिक कस्टम ड्युटी आणि १ टक्का सेस आहे. यामुळे परदेशातून कापूस आणणाऱ्या आयातदारांना एका बेलमागे (३५६ किलो) जवळपास ४ हजार रुपये अतिरिक्त खर्च येणार आहे. परिणामी विदेशी कापूस महाग पडणार असून देशांतर्गत कापसाला मागणी वाढण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करत आहेत.
सध्या खुल्या बाजारात अर्ली वाणाचा कापूस सुमारे ८ हजार रुपये प्रति क्विंटल तर साध्या वाणाचा कापूस ७ हजार ६५० रुपये प्रति क्विंटल दराने व्यवहारात आहे. दोन दिवसांपूर्वी हेच दर यापेक्षा कमी होते. त्यामुळे आता तरी भाव चढतील का? अशी आशा शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे.
याच कारणामुळे अनेक शेतकरी सध्या आपला कापूस लगेच विकण्याऐवजी सीसीआयला देणं टाळून थोडा साठवून ठेवण्याचा विचार करत आहेत. एक-दोन महिने थांबलं तर आणखी दरवाढ मिळेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे पुढील काळात बाजारात आणि सीसीआय केंद्रांवर कापसाची आवक काहीशी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान जागतिक बाजारात कापसाचे दर सध्या ७४ ते ७६ सेंट प्रति पाउंड या मर्यादेत फिरत आहेत. अमेरिकेच्या टॅरिफ वॉरमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर अजूनही अनिश्चितता आहे. त्यामुळे कापसाच्या दरात अचानक मोठी उसळी येण्याची शक्यता कमी असली, तरी हळूहळू आणि स्थिर वाढ होण्याचं वातावरण तयार झालं आहे असं तज्ज्ञ सांगतात.
एकंदरीत काय तर आयात शुल्क लागू झाल्याने कापूस बाजारात आलेली ही हालचाल शेतकऱ्यांसाठी आशादायक आहे. अनेक दिवसांनी भाव वाढतायत अशी चर्चा शेतकऱ्यांच्या बांधावर सुरू झाली आहे. आता पुढचे काही आठवडे कापूस उत्पादकांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर यंदाचा हंगाम थोडाफार का होईना पण दिलासा देणारा ठरू शकतो.
हे पण वाचा | सूर्याच्या महादशेमुळे ‘या’ राशींचे आयुष्य बदलणार; पुढील ६ वर्षांत पैसा, प्रतिष्ठा आणि स्थैर्य मिळण्याचे योग..