Youtube मध्ये करिअर करायच आहे? तर पहा युट्युब 1000 व्ह्यूज वर किती पैसे देते

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Youtube Income : आजच्या घडीला मोबाईल हातात आला की अनेकांच्या डोक्यात एकच विचार येतो आपणही युट्यूब सुरू करायचं का? कुणाचा व्हिडीओ अचानक व्हायरल होतो, लाखो व्ह्यूज मिळतात, आणि लगेच चर्चेला सुरुवात होते की हा युट्यूबर महिन्याला किती कमावत असेल? गावापासून शहरापर्यंत कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांपासून ते नोकरी करणाऱ्या तरुणांपर्यंत सगळ्यांनाच युट्यूबची भुरळ पडलेली दिसते. पण खरंच युट्यूबवर व्हिडीओ टाकला आणि 5000 व्ह्यूज आले, तर खात्यात किती पैसे जमा होतात, हा प्रश्न अनेकांना सतावत असतो. Youtube Income

सोशल मीडियाचं जग वेगानं बदलत आहे. फेसबुक इंस्टाग्रामसोबतच युट्यूब आज कमाईचं मोठं माध्यम बनलं आहे. अनेकजण रोज व्हिडीओ शूट करतात एडिट करतात अपलोड करतात आणि व्ह्यूज वाढण्याची वाट पाहतात. काही जणांना सुरुवातीलाच चांगला रिस्पॉन्स मिळतो तर काही जण महिनोन्‌महिने मेहनत करूनही फारसं काही मिळत नाही. अशा वेळी सगळ्यांनाच एक प्रश्न पडतो आपण एवढी मेहनत करतोय पण 5000 व्ह्यूजला नेमकी कमाई किती? खरं सांगायचं तर युट्यूब प्रत्येक व्ह्यूसाठी थेट पैसे देत नाही ही गोष्ट अनेकांना माहीतच नसते. युट्यूबची कमाई ही मुख्यतः जाहिरातींवर अवलंबून असते. म्हणजे तुमच्या व्हिडीओवर किती लोकांनी जाहिरात पाहिली किती वेळ पाहिली त्यावर क्लिक केलं का यावर पैसे मिळतात. समजा तुमच्या व्हिडीओला 10 हजार व्ह्यूज आले पण त्यावर जाहिरातच लागली नाही तर कमाई शून्य असू शकते. उलट एखाद्या व्हिडीओला 5000 व्ह्यूज आले आणि त्यावर जाहिराती व्यवस्थित चालल्या तर त्यातून पैसे मिळू शकतात.

युट्यूबच्या नियमांनुसार आधी चॅनेलला यूट्यूब पार्टनर प्रोग्राममध्ये सामील व्हावं लागतं. म्हणजेच किमान 1000 सबस्क्राइबर्स आणि 4000 वॉच अवर्स किंवा शॉर्ट्ससाठी ठराविक व्ह्यूज पूर्ण करावे लागतात. त्यानंतरच जाहिराती सुरू होतात. त्यानंतरही कमाई ठरते ती प्रेक्षक कोणत्या देशातील आहेत व्हिडीओ कोणत्या विषयावर आहे जाहिरातदार किती पैसे देतो यावर.

साधारण अंदाजाने पाहिलं तर भारतात एखाद्या व्हिडीओला 5000 व्ह्यूज मिळाले आणि त्यावर जाहिराती व्यवस्थित लागल्या तर २५ ते ७५ डॉलरपर्यंत म्हणजेच साधारण २००० ते ६००० रुपये कमाई होऊ शकते. मात्र हा आकडा कायमस्वरूपी नसतो. कधी कमीही होऊ शकतो तर कधी याहून जास्तही मिळू शकतो. शिक्षण फायनान्स टेक्नॉलॉजीसारख्या विषयांवर जाहिरातींचे दर जास्त असतात तर मनोरंजन किंवा व्ह्लॉगसारख्या व्हिडीओंवर दर तुलनेने कमी असतात.

महत्त्वाचं म्हणजे युट्यूबवर कमाई फक्त जाहिरातींपुरती मर्यादित नाही. एकदा चॅनेल मोठं झालं की युट्यूब प्रीमियम सबस्क्रिप्शनमधून पैसे मिळतात, चॅनेल मेंबरशिप सुरू करता येते स्वतःचं मर्चेंडाइज विकता येतं. त्याचबरोबर स्पॉन्सर्ड व्हिडीओ ब्रँड डील्स, अ‍ॅफिलिएट मार्केटिंग यातून अनेक युट्यूबर्सची खरी कमाई सुरू होते. काही वेळा जाहिरातींपेक्षा स्पॉन्सरशिपमधूनच जास्त पैसे मिळतात, हे वास्तव आहे.

म्हणजेच युट्यूबवर 5000 व्ह्यूज आले म्हणजे लगेच मोठी कमाई होईल असा समज करून घेणं चुकीचं ठरू शकतं. सुरुवातीला पैसे कमी असतात पण सातत्य योग्य विषय प्रेक्षकांचा विश्वास आणि वेळ दिला तर याच युट्यूबमधून अनेकांनी आपली नोकरी सोडून पूर्णवेळ करिअर उभं केल्याची उदाहरणंही आहेत. त्यामुळे युट्यूबर बनायचं स्वप्न पाहत असाल, तर फक्त व्ह्यूज नाही, तर संयम आणि सातत्य यालाच खरी कमाई समजावी लागते.

Leave a Comment