लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! डिसेंबर-जानेवारी महिन्याचे ₹3,000 एकत्र या दिवशी खात्यात जमा होणार; तारीख आली समोर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mazi Ladaki Bahin Yojana : राज्यातील कोट्यवधी महिलांसाठी एक दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात तब्बल ३,००० रुपये एकाच वेळी जमा होणार असून, याची संभाव्य तारीखही आता स्पष्ट झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून “डिसेंबरचा हप्ता कधी येणार?” असा प्रश्न महिलांकडून सातत्याने विचारला जात होता, त्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे.

डिसेंबर महिना संपून जानेवारीचा पहिला आठवडाही उलटला, तरी अनेक महिलांच्या खात्यात अजून डिसेंबरचा हप्ता जमा झालेला नाही. मागील आठवड्यात नोव्हेंबर महिन्याचे १,५०० रुपये जमा झाल्यानंतर महिलांना पुढील हप्त्याची अपेक्षा होती. दरम्यान, दोन्ही हप्ते एकत्र दिले जाणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर महिलांमध्ये आशा आणि उत्साहाचं वातावरण आहे. विशेषतः सणासुदीच्या काळात ही मदत महिलांसाठी मोठा आधार ठरणार आहे. Mazi Ladaki Bahin Yojana

मकरसंक्रांतीपूर्वी मिळणार ₹३००० सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मिळालेल्या माहितीनुसार, १४ जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारीचे मिळून ३,००० रुपये जमा केले जाणार आहेत. १४ जानेवारीला मकरसंक्रांत साजरी होणार असून, त्याच्या एक दिवसानंतर म्हणजे १५ जानेवारीला महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर महिलांना सणापूर्वी आर्थिक दिलासा देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या सव्वाकोटीहून अधिक महिलांना दरमहा १,५०० रुपयांची मदत दिली जाते. शासन निर्णयानुसार प्रत्येक महिन्याच्या दहाव्या तारखेपर्यंत हा हप्ता देण्याचं उद्दिष्ट असतं. त्यामुळे याच धोरणानुसार या महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे लवकर जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

१० ते १४ जानेवारीदरम्यान पैसे जमा होण्याची शक्यता

महिला व बालविकास विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, १० ते १४ जानेवारीदरम्यान लाडकी बहीण योजनेचा हप्ता खात्यात जमा केला जाऊ शकतो. सोलापूरचे महिला व बालविकास अधिकारी किरण जाधव यांनीही याबाबत माहिती देताना सांगितलं आहे की, मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र देण्याचे नियोजन सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या हप्त्यांसाठी महिला व बालविकास विभागाने आधीच वित्त मंत्रालयाकडे निधीची मागणी केली आहे. निधी उपलब्ध होताच थेट लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे वर्ग केले जातील. त्यामुळे पुढील काही दिवसांत महिलांच्या खात्यात ₹३,००० जमा होण्याची दाट शक्यता आहे.

महिलांसाठी मोठा आधार, घरखर्चाला दिलासा

सणासुदीच्या काळात महागाई वाढलेली असताना, लाडकी बहीण योजनेतून मिळणारे हे पैसे अनेक महिलांसाठी मोठा आधार ठरणार आहेत. घरखर्च, मुलांचं शिक्षण, औषधोपचार किंवा सणासाठी लागणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी ही रक्कम उपयोगी ठरेल. त्यामुळे महिलांनी आपल्या बँक खात्याची स्थिती, आधार-लिंकिंग आणि DBT सक्रिय आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी, असं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात येत आहे. लाडक्या बहिणींसाठी ही बातमी निश्चितच दिलासादायक असून, पुढील आठवड्यात खात्यात येणारे पैसे अनेक घरांमध्ये मकरसंक्रांतीचा गोडवा वाढवणार आहेत.

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment