25 दिवस पैशांचा पाऊस! जूनमध्ये बुध वक्री होताच ‘या’ 3 राशींच्या नशिबाला सोन्याचे दिवस..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Horoscope Update: ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला विशेष महत्त्व आहे. वाणी, बुद्धी, व्यवहार, व्यापार आणि निर्णयक्षमता यांचा तो कारक मानला जातो. चंद्रानंतर सर्वात वेगाने हालचाल करणारा हा ग्रह जेव्हा वक्री होतो, तेव्हा त्याचा प्रभाव थेट मानवी जीवनावर दिसून येतो. यंदा जून महिन्याच्या शेवटी बुध वक्री होणार असून, पुढील तब्बल २५ दिवस काही राशींसाठी ‘वैभवलक्ष्मी’ घेऊन येणारे असणार आहेत.

पंचांगानुसार, २९ जून २०२६ रोजी रात्री ११ वाजून ०५ मिनिटांनी बुध वक्री होईल आणि २४ जुलै २०२६ रोजी पुन्हा मार्गी होईल. या कालावधीत बुधाची चाल काही राशींसाठी अक्षरशः भाग्याचा दरवाजा उघडणारी ठरणार आहे. अडकलेली कामे मार्गी लागतील, पैशाचे प्रश्न सुटतील आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडतील, असे ज्योतिष सांगते.

बुधाची वक्री चाल ‘या’ राशींसाठी ठरणार वरदान

मीन रास (Meen Rashi)

मीन राशीच्या व्यक्तींसाठी बुधाची वक्री चाल अत्यंत शुभ मानली जात आहे. गेले काही महिने चाललेली धावपळ, मानसिक तणाव आणि अडचणी आता हळूहळू दूर होऊ लागतील. आकस्मिक धनलाभाचे योग या काळात प्रबळ असतील. नोकरी करणाऱ्यांना पगारवाढ किंवा पदोन्नतीची बातमी मिळू शकते, तर व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संधी मिळतील.

कुटुंबीयांचा पूर्ण पाठिंबा मिळेल, त्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेणे सोपे जाईल. दूरचे प्रवास घडतील आणि प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. अडकलेले पैसे मिळाल्याने आर्थिक दिलासा मिळेल. मानसिक आरोग्य उत्तम राहील आणि मित्रांसोबत आनंदाचे क्षण अनुभवता येतील. एकूणच, मीन राशीच्या आयुष्यात या २५ दिवसांत मोठा सकारात्मक बदल घडू शकतो.

कर्क रास (Kark Rashi)

कर्क राशीच्या लोकांसाठी बुधाची वक्री चाल दिलासादायक ठरणार आहे. आर्थिक अडचणींमुळे जे त्रास सुरू होते, त्यावर हळूहळू तोडगा निघेल. कर्ज फेडण्यासाठी पैसे उपलब्ध होतील आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग खुली होण्याची शक्यता आहे. Horoscope Update

या काळात कुटुंबात शुभकार्यांचे योग दिसत आहेत. घरासाठी किंवा स्वतःसाठी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीची इच्छा पूर्ण होईल. व्यवसायात प्रगती होईल आणि रखडलेली कामे पूर्ण होतील. आरोग्याच्या बाबतीतही दिलासा मिळेल. मनातील अनेक इच्छा पूर्ण होत असल्याने आत्मविश्वास वाढेल आणि आयुष्यात सकारात्मक ऊर्जा जाणवेल.

कन्या रास (Kanya Rashi)

बुध हा कन्या राशीचा स्वामी असल्याने, त्याची वक्री चाल या राशीसाठी विशेष फलदायी ठरणार आहे. मेहनतीचे फळ मिळेल आणि आतापर्यंत अडकलेली कामे एकामागोमाग पूर्ण होऊ लागतील. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षित यश मिळण्याचे योग आहेत.

या काळात आरोग्य उत्तम राहील, तसेच धार्मिक यात्रा किंवा एखाद्या शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि अडकलेले पैसे हातात येतील. प्रेमसंबंधात स्थिरता येईल आणि नवीन गोष्टी शिकण्याची, नवीन लोकांशी जोडले जाण्याची संधी मिळेल. भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता असून, कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ आयुष्य बदलणारा ठरू शकतो.

टीप : वरील लेख हा ज्योतिषीय माहितीवर आधारित असून, व्यक्तिनिहाय परिणाम वेगळे असू शकतात.

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment