SBI Jobs 2026 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही बातमी मोठा दिलासा देणारी आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये थेट ऑफिसर पदांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही, तर उमेदवारांची निवड थेट शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे अनुभवी आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी मानली जात आहे.
९९६ पदांसाठी भरती; अधिकृत अधिसूचना जाहीर
SBI ने स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर (Specialist Cadre Officer) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून एकूण ९९६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये VP Wealth, AVP Wealth आणि Customer Relationship Executive अशा महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. बँकेने यासाठी अधिकृत अधिसूचना जाहीर केली असून इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत.
अर्जाची अंतिम तारीख वाढली; १० जानेवारी २०२६ पर्यंत संधी
या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आधी २३ डिसेंबर २०२५ होती. मात्र अनेक उमेदवारांना वेबसाइटवर अर्ज करताना तांत्रिक अडचणी येत असल्याने SBI ने अर्जाची मुदत वाढवून १० जानेवारी २०२६ केली आहे. त्यामुळे जे उमेदवार फॉर्म भरू शकले नव्हते, त्यांच्यासाठी ही शेवटची संधी असणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी sbi.bank.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव काय लागणार?
या भरतीसाठी पदानुसार पात्रता निश्चित करण्यात आली आहे.
- VP Wealth पदासाठी उमेदवार किमान पदवीधर असावा आणि संबंधित क्षेत्रात किमान ६ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
- AVP Wealth पदासाठी ग्रॅज्युएशनसोबतच रिलेशनशिप मॅनेजर म्हणून किमान ३ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.
- तर Customer Relationship Executive पदासाठी फक्त ग्रॅज्युएशन पात्रता आवश्यक असून नव्या उमेदवारांनाही संधी मिळू शकते.
पगार ऐकूनच अर्ज कराल! ४४ लाखांपर्यंत पॅकेज
या भरतीचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे मिळणारा पगार.
- VP Wealth पदासाठी तब्बल ४४.७० लाख रुपये वार्षिक पॅकेज दिलं जाणार आहे.
- AVP Wealth पदासाठी सुमारे ३०.२० लाख रुपये वार्षिक पॅकेज मिळणार आहे.
- तर Customer Relationship Executive पदासाठीही ६.२० लाख रुपये वार्षिक पॅकेज देण्यात येणार आहे.
- सरकारी बँकेत एवढ्या मोठ्या पगाराची संधी फारच क्वचित मिळते.
निवड प्रक्रिया कशी असेल?
या भरतीमध्ये कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड त्यांच्या अनुभव, पात्रता आणि प्रोफाइलच्या आधारे शॉर्टलिस्टिंग करून थेट इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे अनुभवी उमेदवारांसाठी ही भरती अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. SBI Jobs 2026
जर तुम्ही बँकिंग क्षेत्रात करिअर घडवण्याचं स्वप्न पाहत असाल आणि चांगला अनुभव असेल, तर SBI मधील ही भरती तुमच्यासाठी आयुष्य बदलणारी संधी ठरू शकते. अर्ज करण्याची अंतिम तारीख जवळ येत असल्याने वेळ न दवडता आजच अर्ज करा आणि स्टेट बँकेत उच्च पगाराच्या नोकरीकडे एक पाऊल टाका.