Mazi Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून सर्वसामान्य महिलांच्या ओठांवर एकच नाव ऐकायला मिळतं माझी लाडकी बहीण योजना. ग्रामीण भागातील, शहरातील सर्व स्तरातील महिलांना आधार देणारी ही योजना आज खरंच अनेक घरांसाठी आशेचा किरण ठरली आहे. महिन्याच्या अखेरीस हातावर काही रुपये राहावेत, घरखर्चाला थोडा हातभार लागू द्यावा, यासाठी सरकारकडून मिळणारे 1500 रुपये महिलांसाठी मोठी मदत बनली आहे.
पण अलीकडच्या काळात या योजनेतील प्रक्रिया, केवायसी, नाव वगळली गेली अशा तक्रारींची एक लाट पसरली होती. अनेक बहिणींचे लाभ अडकले, तर काहींची नावे अपात्रांमध्ये टाकली गेली. त्यामुळे महिलांमध्ये नाराजी होतीच! अशा वेळी आज झालेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात लाडकी बहिण योजनेवर तीव्र चर्चा रंगली. Mazi Ladki Bahin Yojana
विधिमंडळात जोरदार खडाजंगी
आज सभागृहात विरोधकांकडून गंभीर आरोप करण्यात आला की या योजनेत प्रचंड गैरव्यवहार झाले आहेत. आशा वर्कर, ग्रामसेवक आणि अंगणवाडी सेविकांवर लक्ष्य पूर्ण करण्याचा दबाव टाकण्यात आला, त्यामुळे अनेक ठिकाणी बोगस फॉर्म भरले गेले. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी तर थेट सरकारला सवाल केला “जनतेच्या पैशांचा असा गोंधळ, जबाबदार कोण?” या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांकडूनही जोरदार उत्तर दिलं गेलं. महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं की, नावनोंदणीसाठी पोर्टल आणि ऑफलाईन दोन्ही पर्याय ठेवले होते. त्यामुळे अनावश्यक आरोप करु नयेत.
एकनाथ शिंदेंचा मोठा पलटवार!
यावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर तीव्र हल्लाबोल करताना मोठी गोष्ट स्पष्ट केली. त्यांनी विरोधकांना उद्देशून म्हटलं “तुम्ही या योजनेला सुरुवातीपासून विरोधच करत आलात. म्हणूनच निवडणुकीत भोगावं लागलं. आता पुन्हा विरोध केला तर महिलाच तुम्हाला घरी बसवतील.” सभागृहातील वातावरण काही काळ तापलं, पण त्याच क्षणी शिंदेंनी सर्व लाडक्या बहिणींना ऐकायला वाटणारं महत्त्वाचं वाक्य उच्चारलं.