आता पदरात फक्त पुण्यच! १८ जानेवारीपर्यंत ‘या’ ३ राशींचा बँक बॅलन्स अचानक वाढणार; पाहा काय आहे ग्रहांची चाल

Shattila Ekadashi Vrat Vidhi | आपल्या हिंदू धर्मात सण-वारांना श्रद्धेसोबतच विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. सध्या माघ महिना सुरू होत असून, या महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी म्हणजेच ‘षट्ठीला एकादशी’ यंदा खूपच खास ठरणार आहे. विशेष म्हणजे, १४ जानेवारीला येणारी ही एकादशी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर आल्याने दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. एकाच दिवशी विष्णूची भक्ती आणि सूर्याची उपासना करण्याची संधी भाविकांना मिळणार आहे.

​ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने पाहिले तर या दिवशी ग्रहांची स्थिती अत्यंत शुभ आहे. ‘सर्वाथ सिद्धी’ आणि ‘अमृत सिद्धी’ योगासोबतच मकर राशीत सूर्य आणि शुक्राची युती होऊन ‘शुक्रादित्य योग’ निर्माण होत आहे. या मोठ्या बदलाचा फायदा नेमका कोणाला होणार? कोणत्या राशींचे नशीब पालटणार? चला सविस्तर जाणून घेऊया.

​मकर राशी: मानसन्मान आणि प्रगतीचा काळ

​ज्यांची रास मकर आहे, त्यांच्यासाठी हा काळ सुवर्णसंधी घेऊन आला आहे. सूर्य आणि शुक्र तुमच्याच राशीत असल्याने समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. जर तुम्ही राजकारण किंवा प्रशासकीय क्षेत्रात असाल, तर तुम्हाला मोठी पदे किंवा लाभ मिळण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे मार्गी लागतील आणि आरोग्यातही सुधारणा झाल्याने तुम्ही उत्साही राहाल.

​वृषभ राशी: नशिबाची साथ आणि धनलाभ

​वृषभ राशीच्या लोकांसाठी नववे घर सक्रिय होत आहे, त्यामुळे नशिबाची पूर्ण साथ तुम्हाला मिळेल. आई लक्ष्मीच्या आशीर्वादाने आर्थिक अडचणी दूर होतील. विशेष म्हणजे, कुटुंबातील मालमत्तेचे जुने वाद मिटू शकतात. वरिष्ठांचे सहकार्य मिळाल्याने नोकरी-व्यवसायात तुमची प्रगती निश्चित आहे. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल.

​कन्या राशी: बुद्धी आणि पैसा यांचा संगम

​बुध ग्रहाच्या प्रभावामुळे कन्या राशीच्या व्यक्तींना या काळात मोठे आर्थिक लाभ होऊ शकतात. शेअर बाजार किंवा नवीन व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. तुमच्याकडे असलेल्या नेतृत्व गुणामुळे ऑफिसमध्ये तुमची वेगळी ओळख निर्माण होईल. जोडीदारासोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल आणि प्रदीर्घ काळापासून असलेले टेन्शन आता कमी होईल.

Leave a Comment