मकर संक्रांती निमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹3000 येणार? सरकारकडून मिळाली नवीन अपडेट

Ladki Bahin Yojana News : राज्यातील तब्बल २.५ कोटी लाडक्या बहिणींसाठी मकरसंक्रांत हा सण यंदा आनंदाची बातमी घेऊन येणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. जर ही चर्चा खरी ठरली, तर अनेक महिलांच्या खात्यात थेट ₹3000 जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप अधिकृत घोषणा नसल्याने महिलांमध्ये उत्सुकतेसोबतच संभ्रमही आहे.

नोव्हेंबर महिन्याचा ₹1500 चा हप्ता जानेवारीच्या सुरुवातीलाच खात्यात जमा झाला. त्यामुळे “आता उरलेले डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे कधी?” हा प्रश्न प्रत्येक लाडक्या बहिणीच्या मनात आहे. सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, मकरसंक्रांतीच्या आसपास म्हणजेच १४ जानेवारीपर्यंत हा निधी जमा होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे मंत्री गिरीश महाजन यांनी यासंदर्भात ट्विट करत लवकरच ₹3000 जमा होतील, असे संकेत दिले आहेत.

राज्यात सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. १५ जानेवारी रोजी मतदान होत असल्याने, निवडणुकीआधीच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र दुसरीकडे महिला व बालविकास मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी आचारसंहितेमुळे हप्ता उशिरा मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. “निवडणुका संपेपर्यंत आचारसंहिता लागू राहील, त्यामुळे निधी वितरणास विलंब होऊ शकतो,” असे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे महिलांमध्ये ‘पैसे येणार की नाही?’ हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे.

दरम्यान, जानेवारीत आलेल्या नोव्हेंबरच्या ₹1500 मुळे अनेकांचा गैरसमज दूर झाला आहे. सुरुवातीला महिलांना ₹3000 एकरकमी मिळतील, अशी अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात फक्त एकाच महिन्याचा हप्ता जमा झाला. त्यामुळे आता १४ जानेवारीला नेमके किती पैसे येणार, याबाबत स्पष्टता नसल्याने लाडक्या बहिणी रोज खातं तपासत आहेत. Ladki Bahin Yojana News

या योजनेतील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे eKYC. सरकारने ३१ डिसेंबरपर्यंत eKYC पूर्ण करण्याची अंतिम मुदत दिली होती. मात्र लाखो महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. परिणामी, ज्या महिलांनी eKYC केली नाही, त्यांचा ₹1500 चा मासिक लाभ बंद होणार असल्याची माहिती समोर आली आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर eKYC साठी मुदत वाढेल, अशी चर्चा होती, पण सरकारने कोणतीही सवलत दिलेली नाही. उलट, पोर्टलवरून eKYC चा पर्यायही काढून टाकण्यात आला आहे.

याचा थेट परिणाम असा होणार आहे की, ज्या महिलांनी वेळेत eKYC पूर्ण केली आहे आणि ज्या पात्र आहेत, त्यांनाच पुढील हप्त्याचा लाभ मिळणार आहे. उर्वरित महिलांचा लाभ तात्पुरता किंवा कायमस्वरूपी बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक ग्रामीण भागातील महिलांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

एकीकडे मकरसंक्रांतीला ₹3000 मिळण्याची आशा, तर दुसरीकडे आचारसंहिता आणि eKYC मुळे निर्माण झालेली अनिश्चितता अशा परिस्थितीत लाडकी बहीण योजना सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. आता खरा प्रश्न एवढाच आहे, की १४ जानेवारीला लाडक्या बहिणींच्या खात्यात खरोखरच पैसे जमा होणार की नाही? याचं उत्तर सरकारच्या अधिकृत घोषणेतूनच स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत राज्यातील कोट्यवधी महिला आशेवर आणि प्रतीक्षेत आहेत.

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment