Driving Licence Renewal : देशभरातील कोट्यवधी वाहनचालकांसाठी दिलासादायक बातमी आहे. २०२६ मध्ये ज्या वाहनचालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स संपत आहे, त्यांच्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठी आरटीओ कार्यालयात रांगा, फेऱ्या आणि वेळेचा अपव्यय सहन करावा लागत होता. मात्र आता ही डोकेदुखी जवळपास संपली आहे. Driving Licence Renewal
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सारथी (Sarathi Parivahan) पोर्टल अधिक सक्षम केल्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यूअलची प्रक्रिया बहुतांशी ऑनलाइन करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना आरटीओच्या उंबरठ्यावर जाण्याची गरज उरलेली नाही. मोबाईल किंवा संगणकवरून काही मिनिटांत अर्ज करता येत असल्याने सामान्य वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ड्रायव्हिंग लायसन्स हे वाहन चालवण्यासाठी कायदेशीरदृष्ट्या आवश्यक कागदपत्र आहे. खाजगी वाहनचालकांचा परवाना साधारणपणे २० वर्षांसाठी किंवा वयाच्या ४०–५० वर्षांपर्यंत वैध असतो. तर व्यावसायिक ड्रायव्हिंग लायसन्स (ट्रक, बस, टॅक्सी) दर ३ ते ५ वर्षांनी नूतनीकरण करणे बंधनकारक आहे. विशेष बाब म्हणजे, परवाना संपण्याच्या एक वर्ष आधीपासूनच नूतनीकरणासाठी अर्ज करता येतो.
जर ड्रायव्हिंग लायसन्सची वैधता संपली, तर सरकारकडून ३० दिवसांचा ग्रेस पीरियड दिला जातो. या कालावधीत अर्ज केल्यास कोणताही दंड आकारला जात नाही. मात्र ३० दिवसांनंतर अर्ज केल्यास विलंब शुल्क भरावे लागते. तसेच जर परवाना ५ वर्षांपेक्षा जास्त काळासाठी एक्सपायर झाला असेल, तर नवीन लायसन्स काढणे किंवा पुन्हा ड्रायव्हिंग टेस्ट देणे आवश्यक ठरू शकते.
घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स कसे रिन्यू कराल?
ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठी sarathi.parivahan.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागते. वेबसाइटवर राज्य निवडल्यानंतर Driving Licence Services या पर्यायात जाऊन Renewal of Driving Licence वर क्लिक करावे. त्यानंतर DL नंबर, जन्मतारीख आणि कॅप्चा भरून अर्ज प्रक्रिया सुरू होते.
अर्ज करताना ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, फोटो आणि स्वाक्षरी अशी कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करावी लागतात. शुल्क भरण्यासाठी UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगचा पर्याय उपलब्ध आहे. काही प्रकरणांमध्ये बायोमेट्रिक किंवा कागदपत्र पडताळणीसाठी जवळच्या RTO मध्ये अपॉइंटमेंट घ्यावी लागू शकते.
अर्ज पूर्ण झाल्यानंतर अर्ज क्रमांकाच्या मदतीने नूतनीकरणाची स्थिती ऑनलाइन तपासता येते. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १५ ते ३० दिवसांत नूतनीकरण केलेले स्मार्ट ड्रायव्हिंग लायसन्स कार्ड थेट घरच्या पत्त्यावर पोस्टाने पाठवले जाते. Driving Licence Renewal
वाहनचालकांसाठी महत्त्वाचा सल्ला
ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपल्यानंतर वाहन चालवणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे दंड, कारवाई आणि अनावश्यक त्रास टाळण्यासाठी परवाना संपण्यापूर्वीच नूतनीकरणासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. सरकारने दिलेल्या ऑनलाइन सुविधेचा लाभ घेत वेळ, पैसा आणि कष्ट वाचवण्याचे आवाहन वाहनचालकांना करण्यात येत आहे.
रा कवडगाव तालुका परंडा जिल्हा धाराशिव