Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाखो महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर आता जानेवारीच्या ₹१५०० हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली, तरी राजकीय हालचाली आणि निवडणुकीचे वेळापत्रक पाहता एक महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
राज्यात येत्या काही दिवसांत जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता झेडपी निवडणुकीआधीच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो, अशी जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे अनेक महिलांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.
झेडपी निवडणुकीआधी पैसे येण्याची शक्यता
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद निवडणुका ५ फेब्रुवारी रोजी होणार असून त्याचा निकाल ७ फेब्रुवारीला लागणार आहे. याआधीच महिलांच्या खात्यात ₹१५०० जमा केले जाऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे. महापालिका निवडणुकीआधी जसा डिसेंबरचा हप्ता देण्यात आला होता, तसाच पॅटर्न यावेळीही वापरला जाऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
जर हा अंदाज खरा ठरला, तर पुढील १५ ते २० दिवसांत महिलांच्या खात्यात जानेवारीचा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये सध्या या योजनेबाबत मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. Ladki Bahin Yojana Update
‘या’ महिलांनाच मिळणार ₹१५००
महत्त्वाची बाब म्हणजे, सर्व महिलांना हा हप्ता मिळेलच असे नाही. मागील डिसेंबर महिन्यात अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते. यामागे प्रमुख कारण म्हणजे केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण न करणे. शासनाने स्पष्टपणे सांगितले आहे की, ज्या लाभार्थी महिलांनी केवायसी केलेली नाही, त्यांचा लाभ थांबवला जाऊ शकतो.
याशिवाय, योजनेच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांचाही लाभ बंद केला जाणार आहे. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे पात्रता तपासणे आणि आवश्यक कागदपत्रे पूर्ण ठेवणे अत्यंत गरजेचे ठरणार आहे.
डिसेंबर-जानेवारीचा एकत्र हप्ता मिळेल का?
काही दिवसांपूर्वी डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात डिसेंबरचाच हप्ता देण्यात आला. यामुळे अनेक महिलांच्या मनात नाराजी निर्माण झाली होती. आता मात्र झेडपी निवडणुकीआधी तरी जानेवारीचा हप्ता मिळेल, अशी अपेक्षा महिलांकडून व्यक्त केली जात आहे.
एकंदरीत, अधिकृत घोषणा होईपर्यंत महिलांनी अफवांवर विश्वास न ठेवता, आपली केवायसी पूर्ण आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. कारण योग्य कागदपत्रे आणि पात्रता असलेल्या महिलांनाच लाडकी बहीण योजनेचा पुढील ₹१५०० हप्ता मिळणार आहे. पुढील काही दिवसांत याबाबत सरकारकडून स्पष्ट माहिती येण्याची शक्यता आहे.