महिलांसाठी खुशखबर! या 12 जिल्ह्यातील महिलांसाठी ₹2100 झाले जाहीर? जाणून घ्या सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana News: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू झाल्यापासून राज्यातील लाखो महिलांना दरमहा आर्थिक आधार मिळतोय. मात्र बोगस लाभार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी शासनाने ई-केवायसी सक्तीची केल्यानंतर अनेक लाडक्या बहिणी अडचणीत सापडल्या होत्या. सरकारचा उद्देश चांगला होता, पण सुरुवातीला पोर्टलच सक्षम नसल्याने या प्रक्रियेचा मोठा फटका सामान्य महिलांना बसला.

एकाच वेळी हजारो महिलांनी ई-केवायसी करण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोर्टल वारंवार हँग होत होते. कुणाला ओटीपी येत नव्हता, तर कुणाची प्रक्रिया अर्धवट अडकत होती. ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेटची समस्या असल्यामुळे अनेक बहिणींना तासन्‌तास वाट पाहावी लागली. काहींनी तर दोन-तीन दिवस प्रयत्न करूनही ई-केवायसी पूर्ण होऊ शकली नव्हती. त्यामुळे 31 डिसेंबर ही शेवटची तारीख जवळ येताच महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं आपला हप्ता बंद तर होणार नाही ना? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात होता. Ladki Bahin Yojana News

सरकारचा हस्तक्षेप, लाडक्या बहिणींना दिलासा

या सगळ्या परिस्थितीची दखल घेत सरकारने अखेर महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता ई-केवायसीसाठी थेट अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जाणार आहे. हा निर्णय विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील महिलांसाठी मोठा दिलासा देणारा ठरणार आहे.

शासनाच्या नव्या सूचनेनुसार, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आपली आवश्यक कागदपत्रांची सत्यप्रत अंगणवाडी सेविकेकडे जमा करता येणार आहे. अंगणवाडी ताई स्वतः महिलांच्या घरी जाऊन कागदपत्रांची तपासणी करतील आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून देतील. मोबाईल, ओटीपी, इंटरनेट यामुळे अडकलेली प्रक्रिया आता मानवी मदतीने पूर्ण होणार असल्याने हजारो महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

2100 रुपयांचा हप्ता नेमका कधी?

विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुती सरकारने लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र सध्या महिलांना 1500 रुपयांचाच सन्माननिधी मिळतो आहे. यावरून विरोधकांनी सरकारवर अनेकदा टीका केली असून लाडक्या बहिणींची फसवणूक झाली असा आरोप केला जातोय.

यावर सत्ताधाऱ्यांकडून मात्र पुन्हा पुन्हा एकच भूमिका मांडली जातेय योग्य वेळी 2100 रुपयांचा हप्ता दिला जाईल. मात्र ती ‘योग्य वेळ’ नेमकी कधी येणार, याबाबत अद्याप कोणतीही ठोस तारीख जाहीर झालेली नाही. त्यामुळे बहिणी अजूनही प्रतीक्षेत आहेत.

ई-केवायसीतील चुका दुरुस्त करण्याची संधी

ई-केवायसी करताना घाईगडबडीत अनेक महिलांकडून चुकीची माहिती भरली गेली. कुणाचा आधार नंबर चुकला, कुणाचं नाव जुळलं नाही, तर काहींची प्रक्रिया अपूर्ण राहिली. त्यामुळे अनेक अर्ज अडकल्याचं प्रशासनाच्या लक्षात आलं.

आता सरकारने अशा महिलांना ई-केवायसीतील चुका दुरुस्त करण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे केवळ तांत्रिक कारणांमुळे लाभापासून वंचित राहण्याची भीती कमी झाली आहे. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून ही दुरुस्ती प्रक्रिया अधिक सुलभ होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

एकूणच, सुरुवातीला गोंधळ उडालेल्या ई-केवायसी प्रक्रियेमुळे लाडक्या बहिणींच्या मनात निर्माण झालेली भीती आता हळूहळू कमी होताना दिसतेय. अंगणवाडी ताईंच्या मदतीने ही प्रक्रिया पूर्ण झाल्यास, योजना पुन्हा सुरळीत रुळावर येईल, अशी अपेक्षा महिलांकडून व्यक्त केली जात आहे.

संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा

Leave a Comment