Kisan Sanman Nidhi Yojana: देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी दिलासा ठरलेली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही आजही ग्रामीण भारताचा मजबूत आधार आहे. खतं, बियाणं, औषधं, मजुरी असे वाढते खर्च भागवण्यासाठी ही योजना शेतकऱ्यांच्या हातात थेट पैसे देणारी ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये दिले जातात. हे पैसे तीन समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी २,००० रुपये थेट बँक खात्यात जमा होतात. त्यामुळे प्रत्येक हप्त्याची तारीख शेतकरी मोठ्या आशेने पाहत असतो.
२२ वा हप्ता कधी येणार?
आत्तापर्यंतचा २१ वा हप्ता १९ नोव्हेंबर २०२५ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता. त्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे २२ व्या हप्त्याकडे. सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली, तरी विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार फेब्रुवारी २०२६ च्या अखेरीस हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण या आनंदाच्या बातमीसोबतच एक महत्त्वाचा इशाराही आहे…
‘या’ शेतकऱ्यांना २२ वा हप्ता मिळणार नाही
सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की काही अटी पूर्ण न केल्यास शेतकऱ्यांचा हप्ता थांबवला जाऊ शकतो. अनेक वेळा लहानसहान चुका मोठं नुकसान करून जातात. Kisan Sanman Nidhi Yojana
१) ई-केवायसी अपूर्ण असेल तर…
ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांना २२ वा हप्ता मिळणार नाही. सरकारने ई-केवायसी सक्तीची केली असून, ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास पैसे खात्यात येत नाहीत.
२) आधार-बँक लिंक नसेल तर पैसे अडकणार
पीएम किसानचा पैसा डीबीटीद्वारे थेट खात्यात येतो. तुमचं बँक खाते आधारशी लिंक नसेल किंवा डीबीटी सेवा बंद असेल, तर हप्ता जमा होणार नाही.
३) बँक तपशीलात चूक असेल तर…
खाते क्रमांक, IFSC कोड किंवा बँकेचं नाव चुकीचं असल्यास हप्ता परत जातो. अनेक शेतकऱ्यांना यामुळे पैसे मिळायला उशीर होतो.
४) लाभार्थी यादीत नाव नसेल तर हप्ता नाही
काही वेळा कागदपत्रे अपडेट न केल्याने किंवा चुकीच्या माहितीतून शेतकऱ्याचं नाव लाभार्थी यादीतून वगळलं जातं. अशावेळी हप्ता थांबतो.
५) शेतकरी नोंदणी अपूर्ण असेल तर धोका
सरकारने आता शेतकरी नोंदणी अनिवार्य केली आहे. भविष्यात फक्त नोंदणीकृत शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
तुमची स्थिती घरबसल्या कशी तपासाल?
शेतकरी बांधवांनी थेट pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन
- लाभार्थी स्थिती
- नाव यादीत आहे का
- ई-केवायसी स्थिती
- बँक व आधार लिंक आहे का
हे सर्व तपासून घ्यावे.
शेवटचं महत्त्वाचं आवाहन
२२ व्या हप्त्याची अधिकृत घोषणा होण्याआधीच,
- ✔ ई-केवायसी पूर्ण करा
- ✔ आधार-बँक लिंक तपासा
- ✔ बँक तपशील दुरुस्त करा
- ✔ शेतकरी नोंदणी पूर्ण ठेवा
कारण सरकारने हप्ता जारी केल्यानंतर दुरुस्तीची संधी मिळेलच, याची खात्री नसते. आज थोडं लक्ष दिलंत, तर उद्या २००० रुपये थेट खात्यात येतील – कोणताही अडथळा न होता. ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. एक छोटी माहिती कुणाच्या तरी मोठ्या अडचणी वाचवू शकते.