Ladki Bahin Yojana: राज्यातील कोट्यवधी महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांच्या खात्यात लवकरच ₹3000 रुपये थेट जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही आठवड्यांपासून हप्त्याबाबत संभ्रम असलेल्या लाडक्या बहिणींना आता दिलासा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा माहोल सुरू आहे. आचारसंहिता लागू असतानाही सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी हालचाली वेगात सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांना दोन महिन्यांचे अनुदान एकत्र दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
14 जानेवारीआधीच खात्यात पैसे येणार?
महिला आणि बाल विकास विभागातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 14 जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन हप्त्यांचे एकत्रित ₹3000 रुपये जमा केले जाऊ शकतात. त्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा थकलेला लाभ एकाचवेळी मिळण्याची शक्यता आहे. ही रक्कम मिळाल्यास अनेक कुटुंबांना आर्थिक आधार मिळणार आहे.
महागाई, घरखर्च, मुलांचे शिक्षण आणि सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ही रक्कम महिलांसाठी मोठा आधार ठरणार आहे. अनेक महिलांनी “हप्ता कधी येणार?” असा प्रश्न विचारत असताना, आता आशेचा किरण दिसू लागला आहे. Ladki Bahin Yojana
केवायसी न केल्यास अडचणीत येऊ शकतात लाभार्थी
दरम्यान, सरकारने योजनेसाठी केवायसी (KYC) प्रक्रिया अनिवार्य केली आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, राज्यात एकूण सुमारे 2 कोटी 42 लाख लाभार्थी आहेत. मात्र, त्यापैकी आतापर्यंत फक्त 1 कोटी 60 लाख महिलांनीच केवायसी पूर्ण केली आहे. उर्वरित महिलांनी वेळीच केवायसी न केल्यास त्यांचा हप्ता अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे ज्या महिलांनी अद्याप केवायसी केलेली नाही, त्यांनी तात्काळ जवळच्या सेवा केंद्रावर किंवा अधिकृत माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
लाडकी बहीण योजना – महिलांसाठी आधाराची काठी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी केवळ आर्थिक मदत नसून, त्यांच्या आत्मसन्मानाचा आणि सुरक्षिततेचा आधार बनली आहे. दरमहा मिळणारी रक्कम अनेक घरांमध्ये खर्चाचा भार हलका करत आहे. त्यामुळे येणारे ₹3000 रुपये अनेक महिलांसाठी नुसते पैसे नसून, विश्वास आणि दिलासाचं प्रतीक ठरणार आहेत.
महत्त्वाचं : खात्याशी आधार लिंक आहे का, बँक खाते सुरू आहे का आणि केवायसी पूर्ण झाली आहे का, हे एकदा नक्की तपासा. लाडक्या बहिणींसाठी ही बातमी नक्कीच आनंदाची आहे. आता फक्त अधिकृत घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. थोडा संयम ठेवा… कारण मदत लवकरच खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.