मोठी बातमी! PM Kisan चा 22 वा हप्ता या दिवशी मिळणार! हे काम केले नाही तर लाभ मिळणार नाही

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Yojana: देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजे अडचणीच्या काळातला आधार आहे. बियाणे, खत, औषधं, घरखर्च… सगळं महाग झालेल्या काळात पीएम-किसानचे दरवर्षी मिळणारे ६ हजार रुपये अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देतात. आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे २२ व्या हप्त्याकडे.

नोव्हेंबर २०२५ मध्ये २१ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. त्यानंतर आता पुढचा हप्ता कधी येणार, याचीच चर्चा गावोगावी सुरू आहे. मात्र, सरकारकडून स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की काही महत्त्वाची कामं पूर्ण नसतील, तर हप्ता अडू शकतो.

ई-केवायसी नसेल तर पैसे थांबणार

पीएम-किसानचा पुढील हप्ता मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाची अट म्हणजे आधार ई-केवायसी. अजूनही अनेक शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या खात्यात २२ वा हप्ता जमा होणार नाही, हे स्पष्ट करण्यात आले आहे. ई-केवायसी दोन प्रकारे करता येते. एकतर घरबसल्या मोबाईलवरून किंवा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये जाऊन.

जर तुमचा मोबाईल आधारशी लिंक असेल, तर pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ओटीपीद्वारे ई-केवायसी सहज पूर्ण करता येते. मोबाईल नसल्यास किंवा ओटीपी येत नसेल, तर थेट CSC केंद्रात जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने ई-केवायसी करून घ्यावी. PM Kisan Yojana

बँक खात्याची चूक महागात पडू शकते

अनेक वेळा शेतकरी म्हणतात “सगळं केलंय, तरी पैसे आले नाहीत.” यामागचं मोठं कारण असतं बँक खाते आणि आधार लिंक नसणं. पीएम-किसानचा पैसा थेट DBT (Direct Benefit Transfer) मार्फत खात्यात येतो. जर खाते आधारशी लिंक नसेल, DBT सक्रिय नसेल किंवा खाते बंद/चुकीचं असेल, तर पैसे परत जातात.

म्हणूनच, वेळ न दवडता बँकेत जाऊन –

  • ✔ खाते आधारशी लिंक आहे का
  • ✔ DBT सुरू आहे का
  • ✔ खाते क्रमांक बरोबर आहे का
  • याची खात्री करून घ्या.

छोट्या चुका, पण मोठा तोटा

नावात स्पेलिंगची चूक, आधार क्रमांक चुकीचा, जमिनीच्या नोंदी अपडेट नसणं. अशा छोट्या-छोट्या चुका अनेक शेतकऱ्यांचा हप्ता रोखतात. त्यामुळे pmkisan पोर्टलवर जाऊन Beneficiary Status तपासणे खूप गरजेचे आहे.

२२ वा हप्ता कधी येणार?

सरकारकडून अजून अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार फेब्रुवारी महिन्यात २२ वा हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण त्यासाठी वरील सर्व प्रक्रिया पूर्ण असणं अत्यंत आवश्यक आहे. थोडक्यात सांगायचं तर, पीएम-किसानचा पुढील हप्ता हवा असेल तर आजच ई-केवायसी, आधार-लिंक बँक खाते आणि माहिती तपासणी करा. कारण वेळ गेल्यावर “पैसे का आले नाहीत?” असं विचारून उपयोग नसतो. शेतकऱ्यांच्या कष्टाचं चीज व्हावं, यासाठी ही छोटी कामं वेळेत करणंच शहाणपणाचं आहे.

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment