6 जानेवारीपासून ते 31 जानेवारी पर्यंत इतक्या दिवस राहणार बँका बंद पहा सुट्ट्यांची यादी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank Holiday News: नवीन वर्ष सुरू झालंय आणि अनेक जण जानेवारी महिन्यात बँकेची कामं उरकायचा प्लॅन करत असतात. कुणाला पासबुक अपडेट करायचंय, कुणाला चेक जमा करायचा आहे, तर कुणाला केवायसी किंवा डिमांड ड्राफ्टचं काम आहे. पण जर तुम्हीही असा काही विचार करत असाल, तर बँकेत जाण्याआधी ही बातमी नक्की वाचा, कारण जानेवारी 2026 मध्ये बँका तब्बल 16 दिवस बंद राहणार आहेत. Bank Holiday News

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) अधिकृत सुट्टी कॅलेंडरनुसार, जानेवारी महिन्यात सण-उत्सव, प्रादेशिक सुट्ट्या, दुसरा-चौथा शनिवार आणि रविवार मिळून अनेक दिवस बँकांचे व्यवहार ठप्प राहणार आहेत. म्हणजेच महिन्यातील निम्म्याहून अधिक दिवस बँक शाखेत प्रत्यक्ष काम होणार नाही.

या सुट्ट्यांमुळे पासबुक अपडेट कॅश जमा किंवा काढणे चेक क्लिअरन्स, डिमांड ड्राफ्ट, केवायसी अपडेट यांसारख्या कामांवर थेट परिणाम होणार आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे UPI, मोबाइल बँकिंग नेट बँकिंग आणि एटीएम सेवा 24 तास सुरूच राहणार आहेत, त्यामुळे डिजिटल व्यवहार मात्र सुरळीत करता येतील.

आरबीआयच्या यादीनुसार जानेवारी 2026 मध्ये काही सुट्ट्या संपूर्ण देशासाठी असतील, तर काही सुट्ट्या विशिष्ट राज्यांपुरत्या मर्यादित असतील. म्हणजेच एका राज्यात बँक बंद असली, तरी दुसऱ्या राज्यात सुरू असण्याची शक्यता आहे. भारतात बँका साधारणपणे दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद, तर पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी सुरू असतात, हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे.

जानेवारी महिन्यात 1 तारखेला नववर्ष आणि गान-नगईमुळे काही शहरांमध्ये बँका बंद राहतील. 3 जानेवारीला हजरत अली जयंतीनिमित्त लखनऊमध्ये स्थानिक सुट्टी असेल. 10 जानेवारीला दुसरा शनिवार, 11 आणि 18 व 25 जानेवारीला रविवार असल्याने बँका बंद राहणार आहेत. 14 आणि 15 जानेवारीला मकर संक्रांत पोंगल उत्तरायण पुण्यकाल यांसारख्या सणांमुळे अनेक राज्यांमध्ये बँकांना सुट्टी आहे. 23 जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती, सरस्वती पूजा बसंत पंचमी निमित्त काही शहरांत बँका बंद राहतील. 24 जानेवारीला चौथा शनिवार आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन असल्याने संपूर्ण देशात बँका बंद असतील.

एकंदरीत पाहता 6 ते 31 जानेवारीदरम्यान तब्बल 16 दिवस बँकांमध्ये प्रत्यक्ष व्यवहार होणार नाहीत, त्यामुळे नागरिकांनी आपली बँकेची महत्त्वाची कामं आधीच नियोजन करून करणं आवश्यक आहे. विशेषतः चेक क्लिअरन्स कॅश व्यवहार किंवा कागदी प्रक्रियेशी संबंधित कामं शेवटच्या क्षणासाठी ठेवू नयेत, असा सल्ला दिला जात आहे.

दरम्यान, बँका बंद असल्या तरी ग्राहक UPI, Google Pay, PhonePe, Paytm यांसारख्या अ‍ॅप्सद्वारे पैसे ट्रान्सफर करू शकतात. मोबाईल बँकिंग अ‍ॅपवरून बिल पेमेंट, बॅलन्स तपासणी, रिचार्ज, फंड ट्रान्सफर सहज करता येतो. एटीएममधून पैसे काढणे, मिनी स्टेटमेंट आणि कार्डलेस कॅश विड्रॉलसारख्या सुविधा देखील उपलब्ध राहणार आहेत.

तरीही बँकेत प्रत्यक्ष जाण्याची गरज असल्यास आपल्या शहरातील स्थानिक सुट्ट्यांची माहिती आधी तपासणं फार महत्त्वाचं आहे कारण सर्वच सुट्ट्या देशभर लागू असतात असं नाही.आरबीआयची अधिकृत वेबसाइट किंवा आपल्या बँकेचं मोबाईल अ‍ॅप पाहून खात्री करूनच बँकेत जाणं ग्राहकांच्या फायद्याचं ठरणार आहे.

हे पण वाचा | नोकरी करण्याची कटकट वाटते? तर नवीन वर्षात हा व्यवसाय सुरू करा मिळणार लाखोंची कमाई

Leave a Comment