केंद्र सरकारचा मोठा निर्णय! कापसाच्या भावात तुफान वाढ; संक्रांतीनंतर दर आणखीन वाढणार..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Price News: कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाचे बातमी समोर येत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घडामोड घडली आहे. केंद्र सरकारने परदेशातून येणाऱ्या कापसावर पुन्हा ११ टक्के आयात शुल्क लागू केल्याने देशांतर्गत कापूस बाजारात हालचाल वाढली असून, अनेक दिवसांपासून दबलेले दर हळूहळू वर चढताना दिसत आहेत. विशेषतः खान्देश भागात कापसाचे दर पुन्हा तेजीकडे वळले असून, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आशेची झलक दिसू लागली आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. उत्पादन घटले होते मात्र दर आहे तिथेच स्थिर दिसत होते. मात्र केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आता कापसाचे दर झपाट्याने वाढताना दिसत आहेत.

आयात शुल्कामुळे बाजाराचा सूर बदलला

३१ डिसेंबरपर्यंत कापसावरील आयात शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले होते. त्यामुळे देशातील टेक्स्टाईल कंपन्या आणि व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर परदेशी, स्वस्त कापसाची खरेदी केली. याचा थेट फटका स्थानिक शेतकऱ्यांना बसला. बाजारात कापसाचे दर घसरत गेले आणि अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघणे अवघड झाले होते. मात्र, १ जानेवारीपासून आयात शुल्क पुन्हा ११ टक्के झाल्याने परदेशी कापूस महाग झाला आणि देशांतर्गत कापसाला मागणी वाढू लागली. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना फायदा होऊ लागला आहे.

खान्देश परिसरात काही दिवसांपूर्वी क्विंटलला सुमारे ७१०० रुपयांवर स्थिरावलेले कापसाचे दर आता ७४०० ते ७६०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. खासगी बाजारात ३०० ते ५०० रुपयांची वाढ झाल्याने कापसाची कोंडी फुटण्याची चिन्हे दिसत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी कमी दरामुळे विक्री थांबवून ठेवलेला कापूस आता हळूहळू बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. पुढील काही दिवसात म्हणजे मकर संक्रांतीच्या सणादरम्यान कापसाचे दर तेजीत येऊ शकतात. Cotton Price News

मकर संक्रांतीनंतर आवक वाढण्याची शक्यता

सध्याची स्थिती पाहता, मकर संक्रांतीपर्यंत बाजार काहीसा स्थिर राहण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मात्र, संक्रांतीनंतर वाढलेले दर आणि बाजाराचा सकारात्मक कल पाहून शेतकरी घरांमध्ये साठवून ठेवलेला कापूस मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी बाहेर काढू शकतात. त्यामुळे बाजारात कापसाची आवक वाढेल आणि त्याचा दरांवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आवक वाढल्यानंतर देखील दर तेजीत राहतात का हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

खासगी बाजार पुन्हा आकर्षणाचे केंद्र

दर घसरले असताना अनेक शेतकरी ‘सीसीआय’च्या खरेदी केंद्रांकडे वळले होते. मात्र, सीसीआयमध्ये ग्रेडिंग, ओलावा, दर्जा अशा अनेक कठोर निकषांमुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. आता खासगी बाजारात दरात सुधारणा झाल्याने शेतकरी पुन्हा खासगी व्यापाऱ्यांकडे वळण्याची शक्यता आहे. यामुळे खासगी जिनर्स आणि व्यापाऱ्यांमध्येही चुरस वाढताना दिसत आहे.

पुढील काळात दर काय संकेत देतात?

आयात शुल्क वाढल्यामुळे कापसाच्या दरात सध्या तरी सकारात्मक बदल दिसून येत आहे. मात्र, पुढील काही आठवड्यांत बाजारात येणारी आवक, जागतिक कापूस दर आणि देशांतर्गत मागणी यावर भावांची दिशा ठरणार आहे. तरीही, अनेक दिवसांनंतर मिळालेल्या भाववाढीमुळे शेतकरी आणि जिनर्स दोघांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांसाठी ही तेजी टिकावी, हीच सध्या सर्वांची अपेक्षा आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment