या राज्यांना हवामान खात्याचा हाय अलर्ट! या तारखेपर्यंत मोठ संकट उद्भवणार? नवीन अंदाज पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Imd High alert : राज्यासह देशभरात मागील काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसत असून त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. थंडीची लाट काहीशी ओसरली असली तरी गारठा अजूनही कायम आहे. सकाळच्या वेळेत कडाक्याची थंडी जाणवत असून वातावरणात प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. अशाच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने देशातील सात राज्यांसाठी हाय अलर्ट जारी करत थेट इशारा दिला आहे. येत्या काही दिवसांत थंडी, दाट धुके, पाऊस आणि वायू प्रदूषण यांचा एकत्रित फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Imd High alert

महाराष्ट्रात उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरींचा प्रभाव काहीसा कमी झाला असला तरी किमान तापमानात मोठी घसरण नोंदवली जात आहे. राज्यातील काही भागांत तापमान थेट ५.५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेल्याने थंडीचा कडाका पुन्हा वाढला आहे. धुळे येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली असून निफाड, जेऊर, परभणी, मालेगाव, अहिल्यानगर, भंडारा, नागपूर आणि यवतमाळ या भागांतही तापमान दहा अंशांच्या आसपास घसरले आहे. यामुळे नागरिकांमध्ये थंडीमुळे आजार वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

थंडीबरोबरच वायू प्रदूषण हे आणखी मोठं संकट बनत चाललं आहे. दिल्ली, मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये हवा आरोग्यासाठी घातक पातळीवर पोहोचली असून श्वसनाचे आजार, सर्दी-खोकला आणि डोळ्यांची जळजळ वाढताना दिसत आहे. महापालिकांकडून हवा स्वच्छ करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी त्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे डॉक्टरांकडून नागरिकांना मास्क वापरण्याचा आणि अनावश्यक बाहेर पडणे टाळण्याचा सल्ला दिला जात आहे.

देशातील अनेक भागांत दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून दृश्यमानता अत्यंत कमी झाल्याने वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. रेल्वे आणि विमान सेवाही काही ठिकाणी प्रभावित होत आहेत. अशातच भारतीय हवामान विभागाने उत्तराखंड, मध्य प्रदेश, ओडिशा आणि कर्नाटक या राज्यांसाठी थंडीच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. १८ ते २० डिसेंबरदरम्यान या भागांत थंडीचा जोर वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

याशिवाय लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश आणि चंदीगढ या राज्यांमध्ये तापमान आणखी घसरण्याचा अंदाज आहे. काही भागांत पारा आणखी खाली जाण्याची शक्यता असून थंडीचा प्रभाव अधिक तीव्र होऊ शकतो. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, १८ डिसेंबर रोजी काही भागांत हलक्या पावसाची शक्यता असून १९ ते २० डिसेंबरदरम्यान पंजाबमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

दुसरीकडे, १७ ते २० डिसेंबर या कालावधीत तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, लडाख आणि पुद्दुचेरी येथे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मॉन्सून जाऊन अनेक महिने झाले असले तरी देशातील काही राज्यांत अजूनही पावसाची स्थिती कायम असल्याने हवामानातील ही अस्थिरता अधिकच चिंतेची ठरत आहे.

एकूणच, थंडी, धुके, पाऊस आणि प्रदूषण या चौफेर संकटामुळे पुढील काही दिवस नागरिकांसाठी आव्हानात्मक ठरणार असून, भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

हे पण वाचा | जानेवारी 2026 मध्ये नशीब उघडणार! या 3 राशींच्या आयुष्यात पैसा-नोकरी-प्रेम सगळं जमून येणार

Leave a Comment