‘या’ बाजारात कांद्याची सर्वात जास्त आवक! दरात देखील तुफान वाढ; पहा आजचे कांदा बाजारभाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kanda Bajar Bhav: सध्या राज्यात कांद्याचा हंगाम जोरात सुरू असून, शेतकऱ्यांच्या नजरा रोज सकाळी एकाच गोष्टीकडे लागलेल्या असतात. आज बाजारात कांद्याला किती भाव मिळतोय? कारण कांदा हे पीक शेतकऱ्यांच्या जीवनाशी थेट जोडलेलं आहे. कधी जादा आवक, कधी अचानक घसरण, तर कधी चांगला भाव मिळून दिलासा अशा सगळ्या भावना आजच्या कांदा बाजारात पाहायला मिळतात.

आज शुक्रवार, २६ डिसेंबर रोजी राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली. कृषि पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज राज्यात एकूण १ लाख ५४ हजार ४९९ क्विंटल कांदा दाखल झाला. यामध्ये सोलापूर आणि अहिल्यानगर (पारनेर) या दोन बाजारांचा मोठा वाटा राहिला.

सोलापूर बाजारात आज तब्बल ३७ हजार ६८० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. एवढ्या मोठ्या आवकेमुळे येथे कांद्याचे दर काहीसे दबावात आले. सोलापूरमध्ये लाल कांद्याला किमान १०० रुपये, तर सरासरी १२०० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला. काही शेतकऱ्यांना कमी दराचा फटका बसला असला, तरी दर्जेदार मालाला चांगला भाव मिळाल्याचंही दिसून आलं.

दुसरीकडे, अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर बाजारात ३० हजार ५५० क्विंटल लाल कांद्याची आवक नोंदवली गेली. येथे कांद्याला सरासरी १५०० रुपये प्रती क्विंटल दर मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. मात्र, इथेही कमी दर्जाच्या कांद्याला अपेक्षेपेक्षा कमी दर मिळाल्याचं वास्तव आहे.

नाशिक जिल्ह्यातील बाजारांमध्ये आज कांद्याचे दर तुलनेने मजबूत राहिले. येवला आणि देवळा बाजारात लाल कांद्याला सरासरी १८२५ रुपये, सिन्नर आणि मनमाड येथे सुमारे १८०० रुपये, तर लासलगाव-विंचूर बाजारात १८७५ रुपये प्रती क्विंटल दर मिळाला. त्यामुळे नाशिक पट्ट्यातील कांदा उत्पादकांना थोडासा दिलासा मिळाल्याचं चित्र आहे.

राज्यातील इतर बाजार समित्यांकडे पाहिलं तर मुंबई कांदा-बटाटा मार्केटमध्ये १२ हजार ७३१ क्विंटल कांद्याची आवक झाली असून येथे सरासरी १८५० रुपये दर नोंदवला गेला. कोल्हापूर बाजारात ५२२४ क्विंटल आवक असून सरासरी दर १३०० रुपये राहिला. चंद्रपूर-गंजवड येथे मात्र कमी आवकेमुळे कांद्याला २२०० रुपये प्रती क्विंटल असा चांगला भाव मिळाला.

चिंचवड कांद्याबाबत बोलायचं झालं तर जुन्नर-आळेफाटा बाजारात १२ हजार ८०१ क्विंटल आवक झाली असून येथे सरासरी १७०० रुपये दर मिळाला. तर पोळ कांद्याला पिंपळगाव बसवंत येथे १७ हजार ९४६ क्विंटल आवक असून सरासरी १७५० रुपये दर नोंदवण्यात आला. Kanda Bajar Bhav

उन्हाळ कांद्याच्या बाबतीतही आज राज्यात मिश्र चित्र पाहायला मिळालं. देवळा येथे १३०० रुपये, पिंपळगाव बसवंत येथे १३५० रुपये, कळवण येथे १२०१ रुपये, तर भुसावळ येथे ९०० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला. काही बाजारांत उन्हाळ कांद्याला अपेक्षेपेक्षा कमी दर मिळाल्याने शेतकरी थोडे चिंतेत आहेत.

एकूणच आजचा कांदा बाजार पाहिला तर आवक प्रचंड असूनही दरांमध्ये मोठी तफावत दिसतेय. काही ठिकाणी कांदा खर्च काढेल का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतोय, तर काही बाजारांत चांगल्या भावामुळे थोडा दिलासा मिळतोय. येत्या काही दिवसांत आवक कमी झाली आणि मागणी वाढली, तर दरात सुधारणा होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत. तोपर्यंत मात्र शेतकरी रोज बाजाराकडे आशेने पाहत आहे. आजचा भाव उद्याच्या जगण्याचा आधार ठरेल का?

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment