Ladki Bahin Yojana: राज्य सरकारची लाडकी बहीण योजना सुरू होऊन आता जवळपास दीड वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. या योजनेमुळे राज्यातील कोट्यवधी महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांचा आधार मिळत असून, अनेक कुटुंबांच्या रोजच्या गरजांसाठी ही रक्कम महत्त्वाची ठरत आहे. मात्र आता याच योजनेबाबत एक मोठी आणि चिंतेची बातमी समोर आली आहे. कारण येत्या काही दिवसांत जवळपास ३० ते ४० लाख लाडक्या बहिणी या योजनेतून अपात्र ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेत (mukhymantri ladki bahin Yojana) आता KYC (केवायसी) प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. शासनाने स्पष्ट केलं आहे की, प्रत्येक लाभार्थी महिलेला दरवर्षी केवायसी पूर्ण करणे बंधनकारक राहणार आहे. सध्या सुरू असलेल्या केवायसी प्रक्रियेसाठी ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. या तारखेपर्यंत केवायसी पूर्ण न केल्यास संबंधित महिलेला योजनेतून थेट अपात्र ठरवले जाऊ शकते आणि दरमहा मिळणारे १५०० रुपये थांबवले जाऊ शकतात.
सध्या राज्यात लाडकी बहीण योजनेचे जवळपास २ कोटी ४७ लाख लाभार्थी आहेत. यापैकी आतापर्यंत अंदाजे १ कोटी ६० लाख महिलांनी केवायसी पूर्ण केली आहे, मात्र अजूनही ३० ते ४० लाख महिलांची केवायसी प्रलंबित असल्याची माहिती महिला व बालविकास विभागाकडून समोर आली आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अंतिम मुदतीपर्यंत केवायसी न झाल्यास या सर्व अर्जांना बाद ठरवले जाऊ शकते.
दरम्यान, अनेक महिलांकडून केवायसी करताना अडचणी येत असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. कागदपत्रांची अडचण, आधार–बँक लिंक नसणे, तांत्रिक अडथळे किंवा केंद्रांवरील गर्दी यामुळे अनेक महिलांना वेळेत प्रक्रिया पूर्ण करता येत नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेच हजारो नव्हे तर लाखो महिलांचा मासिक हक्क धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सरकारकडून वारंवार आवाहन केलं जात आहे की, लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवायचा असेल तर ३१ डिसेंबरपूर्वी केवायसी पूर्ण करा. अन्यथा, पुढील महिन्यापासून खात्यात १५०० रुपये जमा होणार नाहीत. त्यामुळे ज्यांनी अजून केवायसी केली नाही, त्यांनी तात्काळ जवळच्या केंद्रावर किंवा अधिकृत माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत गरजेचे ठरणार आहे.
(Disclaimer: वरील दिलेली योजनेची माहिती प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे, या बाबत आम्ही कुठलाही दवा करत नाही योग्य माहिती जाणून घेण्यासाठी नागरिकांनी योजनेच्या अधिकृत वेबसाईटकडे लक्ष द्यावे.)
हे पण वाचा | लाडकी बहीण योजनेमधून 40 लाख महिला पात्र यादीत तुमचे तर नाव नाही ना? एकदा चेक करा