दोन महिने उलटले, तरी खात्यात पैसे नाहीत; लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात कधी येणार 3,000 रुपये?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मिळणाऱ्या मदतीकडे राज्यातील लाखो महिलांचे डोळे लागले आहेत. मात्र नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन महिने संपूनही अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत. घरखर्च, औषधपाणी, मुलांचे शिक्षण अशा रोजच्या गरजांसाठी या रकमेवर अवलंबून असलेल्या लाडक्या बहिणी सध्या प्रचंड अडचणीत सापडल्या आहेत. “पैसे आले असतील” या आशेने अनेक महिला वारंवार बँकेत जाऊन खात्याची चौकशी करताना दिसत आहेत.

गेल्या दोन महिन्यांपासून हप्ता न मिळाल्याने महिलांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. काहींच्या खात्यात आधी नियमित पैसे जमा होत होते, पण अचानक पैसे थांबल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. आचारसंहिता, तांत्रिक अडचणी किंवा लाभार्थी यादीत बदल यामुळे हा निधी रखडल्याची चर्चा सुरू आहे. मात्र अधिकृतपणे सरकारकडून ठोस स्पष्टीकरण न आल्याने महिलांची चिंता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

दरम्यान, नगरपरिषदांच्या निवडणुका पार पडल्या असून आता महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. अशा वातावरणात लाडकी बहीण योजनेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. निवडणुकीआधी महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील का, हा प्रश्न सर्वसामान्य महिलांना सतावत आहे. विशेष म्हणजे, अनेक ठिकाणी महिलांनी “निवडणुकीच्या वेळी तरी पैसे मिळावेत” अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. Ladki Bahin Yojana Update

राजकीय वर्तुळात सध्या एक चर्चा जोर धरू लागली आहे. महापालिका निवडणुकांपूर्वी, मकरसंक्रांतीचा मुहूर्त साधत १४ जानेवारी रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचा हप्ता एकत्र देण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे. असा निर्णय झाला, तर महिलांच्या खात्यात थेट ४५०० रुपये जमा होऊ शकतात. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

सरकारकडून स्पष्ट माहिती न मिळाल्याने महिलांना केवळ वाट पाहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. रोज बँकेत जाऊन पासबुक तपासणे, कर्मचाऱ्यांकडे चौकशी करणे, तरीही ठोस उत्तर न मिळणे—या सगळ्यामुळे महिलांमध्ये नाराजी वाढत आहे. अनेक लाडक्या बहिणी सांगतात की, ही रक्कम वेळेवर मिळाली असती, तर घरचा ताण थोडाफार कमी झाला असता.

आता सर्वांचे लक्ष सरकारच्या निर्णयाकडे लागले आहे. महापालिका निवडणुकीआधी महिलांना दिलासा मिळणार का, की लाडक्या बहिणींना अजून काही दिवस वाट पाहावी लागणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तोपर्यंत मात्र “पैसे कधी येणार?” हा प्रश्न राज्यातील लाखो महिलांच्या मनात घोळतच राहणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment