Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील लाखो बहिणींना आधार देणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाबाबत एक महत्त्वाचं अपडेट समोर आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून केवायसी नाही केली तर योजना बंद… लाभ बंद… अशा चर्चा सुरू होत्या. पण आता मिळालेल्या माहितीनुसार सरकार केवायसीची मुदत पुन्हा वाढवण्याच्या गंभीर तयारीत आहे.
ही योजना 2024 मध्ये सुरू झाली आणि सुरुवातीपासूनच महिलांमध्ये प्रचंड विश्वास निर्माण झाला. निवडणुकांमध्येही या योजनेने मोठा रोल बजावला. लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतरही विधानसभा निवडणुकीत महायुतीला भारी फायदा मिळाला. त्यानंतर तर ही योजना कायम चर्चेत आहेच. Ladki Bahin Yojana
आता येतो मुख्य मुद्दा
राज्यातील लाखो बहिणींना महिन्याला मिळणारे १५०० रुपये हे उत्पन्नाचं एक मोठं आधारस्तंभ बनलं आहे. पण शासनाने केवायसी बंधनकारक केल्यामुळे अनेकजणी चिंतेत होत्या. सध्या राज्यात जवळपास ८० लाख महिलांची केवायसीच बाकी आहे. एवढ्या मोठ्या संख्येची प्रक्रिया एका तारखेपर्यंत पूर्ण होण जवळपास अशक्यच.
यामुळेच महिला व बालविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून असा संकेत मिळतो आहे की शासन लवकरच केवायसीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ जाहीर करू शकतं. सुरुवातीला नोव्हेंबरपर्यंत मुदत होती, नंतर ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली गेली. पण त्यातही लाभार्थ्यांचा मोठा भाग केवायसीपासून वंचितच आहे.
महत्त्वाचा मुद्दा असा
नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ सर्वांना मिळणारच. पण फेब्रुवारीपासून फक्त ई-केवायसी केलेल्यांनाच पैसा मिळेल, अशी प्राथमिक माहिती अधिकाऱ्यांकडून दिली गेलीय.
त्यामुळे आता सरकारकडून जानेवारीपर्यंत केवायसी मुदतवाढ होण्याची जास्त शक्यता व्यक्त केली जात आहे.
थोडक्यात काय?
ज्या बहिणींचं अजून केवायसी राहिलंय त्यांनी काळजी करू नये. सरकारलाही माहिती आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात केवायसी एका वेळेत होणं कठीण आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, उलट प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरकार आणखी वेळ देण्याच्या मूडमध्ये आहे.
लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता!