लाडक्या बहिणींनो, मकर संक्रांतीला खात्यात येणार ३००० रुपये? ‘या’ एका चुकीमुळे हप्ता कायमचा थांबू शकतो!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana 3000 Deposit |​ महाराष्ट्रातील कोट्यवधी महिलांची लाडकी ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण असतानाच, आता मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर मोठी खूशखबर मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

​दोन हप्ते एकाच वेळी मिळणार?

​सोशल मीडियावर सध्या अशा चर्चांना उधाण आले आहे की, १४ जानेवारी म्हणजेच मकर संक्रांतीच्या आधी महिलांच्या बँक खात्यात ३००० रुपये जमा होऊ शकतात. यामध्ये डिसेंबर आणि जानेवारी अशा दोन महिन्यांच्या हप्त्यांचा समावेश असल्याचा दावा केला जात आहे. अनेक ठिकाणी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आणि सोशल मीडिया पोस्टर्सनी हे दावे केले असून, यामुळे महिलांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, विरोधकांनी यावर आचारसंहितेच्या भंगाचा मुद्दा उपस्थित करत टीका सुरू केली आहे.

​ई-केवायसी (e-KYC) नसेल तर पैसे अडकणार!

​एकीकडे आनंदाची बातमी येत असतानाच दुसरीकडे एक महत्त्वाची सूचनाही समोर आली आहे. ज्या महिलांनी अद्याप ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना यापुढील कोणत्याही हप्त्याचा लाभ मिळणार नाही. ३१ डिसेंबर ही ई-केवायसी पूर्ण करण्याची शेवटची मुदत होती. त्यामुळे ज्या भगिनींनी हे काम वेळेत पूर्ण केले आहे, त्यांच्याच खात्यात आता पुढचे पैसे जमा होतील.

​नेमकी अडचण काय होती?

​गेल्या दोन महिन्यांपासून काही तांत्रिक अडचणींमुळे या योजनेचे पैसे रखडले होते. सुरुवातीला नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी अशा तीन महिन्यांचे मिळून ४५०० रुपये एकत्र येतील, अशी चर्चा होती. पण सरकारने गेल्या आठवड्यात फक्त नोव्हेंबरचा हप्ता जमा केला. आता मकर संक्रांतीच्या ‘वाण’ म्हणून राहिलेले दोन हप्ते मिळतील, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Comment