Ladki Bahin Yojana 3000 Rupees | राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या पैशांबाबत सध्या अनेक चर्चांना उधाण आलं आहे. नोव्हेंबर, डिसेंबरचे पैसे अद्याप का मिळाले नाहीत? योजना खरंच बंद होणार का? असे प्रश्न माता-भगिनींच्या मनात होते. या सर्व प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जालन्यात जाहीर सभेतून अत्यंत स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं आहे. त्यामुळे आता महिलांना काळजी करण्याची अजिबात गरज नाही.Ladki Bahin Yojana 3000 Rupees
हप्ते का उशिरा मिळत आहेत?
योजनेचा निधी थांबण्याचं मुख्य कारण म्हणजे राज्यात सुरू असलेली निवडणूक आचारसंहिता. नगरपरिषद, नगरपंचायत आणि आता महापालिका निवडणुकीच्या कामांमुळे निधी वितरणात काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या. मात्र, मुख्यमंत्री म्हणाले की, नोव्हेंबरचा हप्ता महिलांना मिळाला असून, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांचे रखडलेले पैसे लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. सरकार या कामात वेगाने पावलं उचलत आहे.
अपात्र महिलांवर टांगती तलवार!
योजनेचा लाभ घेताना काही ठिकाणी गैरप्रकार झाल्याचं समोर आलं आहे. ज्या महिलांनी खोट्या माहितीच्या आधारे अर्ज भरले होते, त्यांच्यावर आता प्रशासनाने कडक पाऊलं उचलली आहेत.
ई-केवायसी (e-KYC): ज्या महिलांची केवायसी पूर्ण झालेली नाही, त्यांचं नाव यादीतून वगळलं जाऊ शकतं.
३१ डिसेंबरची मुदत संपली असली तरी, अनेक महिलांचे पडताळणीचे काम अजूनही बाकी आहे. त्यामुळे फक्त ‘खऱ्या’ आणि ‘पात्र’ गरजू महिलांनाच यापुढे लाभ मिळणार आहे.
”योजना कधीही बंद होणार नाही!”
विरोधकांकडून योजना बंद होणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात होत्या, पण मुख्यमंत्र्यांनी यावर पूर्णविराम दिला आहे. ते म्हणाले, “ही योजना फक्त १५०० रुपयांची मदत नाही, तर माझ्या बहिणींच्या सन्मानाचा लढा आहे. ही योजना कधीही बंद होणार नाही, उलट आता प्रत्येक लाडकी बहीण ‘लखपती दीदी’ कशी होईल, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.”
थोडक्यात पण महत्त्वाचं…
जर तुमचं नाव पात्र यादीत असेल आणि तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली असेल, तर तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही. सरकार लवकरच राहिलेला सर्व निधी एकाच वेळी तुमच्या बँक खात्यात वळता करण्याची शक्यता आहे.
ग्रामीण भागातील कष्टकरी महिलांपासून ते शहरातील मध्यमवर्गीय महिलांपर्यंत, या योजनेने सर्वांनाच एक हक्काचा आधार दिला आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन, महिलांच्या सक्षमीकरणासाठी उचललेलं हे पाऊल भविष्यात अधिक मजबूत होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यातून आज जाणवला.