Ladki Bahin Yojana :राज्यातील लाखो महिलांसाठी चालवण्यात येणाऱ्या लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार असल्याची महत्त्वाची माहिती आज मिळाली आणि यामुळे अनेक घरांमध्ये पुन्हा एकदा आशेचा किरण दिसू लागलाय. महागाईच्या तडाख्यात हातातल्या पैशाची किंमत दिवसेंदिवस कमी होत असताना शासनाकडून मिळणारा हा ₹३००० चा आधार महिला लाभार्थ्यांसाठी मोठा दिलासा ठरत आहे. गावोगावी, शहरोगावी आज सकाळपासूनच चर्चा सुरू झाली की आपलं नाव यादीत आलंय का? हप्ता कधी येणार? कारण या पैशात कुणी घरचं किराणं भागवतं, कुणी मुलांच्या फीचा काही भाग भरतं, तर कुणी औषधोपचारही भागवते. Ladki Bahin Yojana
योजनेत सांगण्यात आलंय की या दोन्ही महिन्यांचा एकत्रित हप्ता डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात थेट खात्यात जमा होणार आहे, पण यासाठी काही गोष्टी योग्य असल्या पाहिजेत. अनेक महिलांची हुकलेली मदत आणि रोखलेले हप्ते पाहता सरकारनं स्पष्ट केलंय की ज्याचं e-KYC पूर्ण नाही, त्यांना पैसे मिळणार नाहीत. याचा अर्थ असा की एखादी महिला सगळे कागद दिले, नोंदणीही झाली पण e-KYC पूर्ण नाही, तर तिचा हप्ता अडकणार. अनेकांना हे माहितही नसतं आणि नुसतंच पैसे नाही आले म्हणून बँकेत फेरफटका मारावा लागतो.
यासाठी सरकारनं ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मोठी मुदतवाढ दिलीय. म्हणजे वेळ आहे, पण ढिलाई चालणार नाही. कारण गावांतल्या महिलांकडे मोबाईलवर मेसेज वाचण्याचाही वेळ नसतो; कुणी शेतात काम, कुणी घरात धावपळ, तर कुणी मजुरीच्या ठिकाणी. म्हणूनच e-KYC झालंय की नाही हे तपासणं फार महत्वाचं. जवळच्या केंद्रात जाऊन किंवा पोर्टलवर आपला आधार क्रमांक टाकून e-KYCची स्थिती पाहता येते, आणि अपूर्ण असल्यास ताबडतोब अपडेट करावं लागतं.
यातील दुसरं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे बँक खाते NPCI मॅप्ड नसणं. अनेक महिलांकडे पतीच्या नावाचं खाते असतं, किंवा कुटुंबातील सदस्यांच्या खात्यावर अवलंबून राहावं लागतं. पण या योजनेत फक्त स्वतःच्या नावावरचं खाते चालतं. त्यातही आधार सीडिंग पूर्ण असलं पाहिजे. बँकेचा स्टाफ सांगतो मॅडम तुमचं NPCI मॅपिंग नाही आणि त्या महिलेला काही कळत नाही. मग पुन्हा दोन-दोन दिवस बँकेत फेऱ्या. म्हणून आजच प्रत्येकानं स्वतःच्या बँकेत जाऊन खातं आधारशी नीट जोडलेलं आहे का हे तपासून घ्यावं, नाहीतर हप्ता परत जाईल.
आता योजनेतील कागदपत्रांची यादीही मोठी आहे. ओळखपत्र, राहतं ठिकाण, आधार, PAN, उत्पन्नाचा दाखला, वैवाहिक स्थितीनुसार अतिरिक्त कागदपत्रे… यापैकी एखादंही जुळलं नाही तर डेटा मिसमॅच होऊन हप्ता थांबतो. गावातल्या बायकांना हे कधी सांगितलं जात नाही की उत्पन्नाचा दाखला जुना आहे बँक खातं सीड झालेलं नाही आधारवर मोबाइलचं अपडेट नाही. मग त्या म्हणतात अगं, मी तर अर्ज केलाय, पैसे का नाही येत?
आज परिस्थिती अशी आहे की शासनाकडून पैसा देण्याची तयारी आहे, पण लाभार्थ्यांची माहिती जुळत नाही म्हणून पैसा अडकतो. या सर्व गोंधळामुळे महिलांना विनाकारण दारोदारी फिरावं लागतं. काहीजणी तर म्हणतात पाच वेळा केलं e-KYC, तरी ‘अपडेट नाही’ असं दाखवतंय. त्यामुळे शासनानं तांत्रिक अडचणी दूर करण्याचीही गरज आहे, अशी भावना अनेक ठिकाणी दिसते.
पण एक गोष्ट नक्की ज्यांचं e-KYC पूर्ण आहे आणि बँक खाते NPCI मॅपिंगसह सक्रिय आहे, त्यांच्यासाठी या महिन्याचा ₹३००० चा एकत्रित हप्ता मोठी मदत ठरणार आहे. कारण वर्षाअखेरीला येणारे खर्च, मुलांचं शाळा-कॉलेज, घरची रोजची धावपळ… अशा वेळी हा पैसा छोटासा नाही; तो घर चालवणाऱ्या महिलेसाठी मोठा आधार आहे.
सरकारनं लोकांना वारंवार सांगितलं आहे की अर्जाची स्थिती पोर्टलवर तपासा, चूक सापडली तर लगेच दुरुस्त करा, आणि डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या हप्त्यासाठी तयार राहा. हप्ता मिळाल्यावर कोणालाही बँकेत फेऱ्या माराव्या लागू नयेत म्हणून पेमेंट ट्रॅक सुविधा उपलब्ध आहे, जिथे आधार क्रमांक टाकताच संपूर्ण माहिती लगेच दिसते.
एकंदरीत सांगायचं तर, लाडकी बहीण योजनेचा दुहेरी हप्ता जमा होणं ही मोठी बातमी आहे, पण त्यासाठी तुमची कागदपत्रं आणि माहिती अगदी नीटनेटकी असणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर पैसा तुमचाच… पण अडकलेला!
हे पण वाचा| लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी! आता या महिलांवरती होणार कठोर कारवाई! शासनाने दिले आदेश