Ladki Bahin Yojana News : लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांच्या घरात महिन्याचा थोडा आधार मिळत होता. घरखर्च, औषधपाणी, मुलांच्या शाळेची फी अशा छोट्या-मोठ्या गरजांसाठी या योजनेचा हप्ता अनेक महिलांसाठी फार महत्त्वाचा ठरला. पण सध्या गावागावात एकच चर्चा सुरू आहे नोव्हेंबरचा हप्ता अजून का आला नाही? डिसेंबर संपत आला तरी पैसे खात्यात का जमा झाले नाहीत? Ladki Bahin Yojana News
ऑक्टोबरपर्यंत लाडकी बहीण योजनेचे हप्ते
नियमितपणे महिलांच्या खात्यात जमा झाले. त्यानंतर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता येईल, अशी सर्वांनाच अपेक्षा होती. काही दिवसांनी नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र मिळणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यामुळे अनेक महिलांनी चालेल, एकदम ₹४५०० येतील असा अंदाज धरून वाट पाहिली. मात्र डिसेंबर संपायला अवघे काही दिवस उरले तरीही खात्यात पैसे न आल्याने आता महिलांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.
दरम्यान, याच विषयावर आता एक महत्त्वाची आणि थोडी टेन्शन वाढवणारी माहिती समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत काही महिलांना पुढे लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. म्हणजेच सर्व महिलांच्या खात्यात ₹४५०० जमा होणार नाहीत.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या महिलांनी योजनेचे निकष पूर्ण न करता लाभ घेतला आहे, अशा महिलांचा लाभ कायमस्वरूपी बंद केला जाणार आहे. उत्पन्न मर्यादा, कुटुंबातील इतर शासकीय लाभ, चुकीची माहिती देऊन अर्ज केलेले प्रकरणे अशा सर्व प्रकरणांची तपासणी सुरू आहे. या तपासणीत अपात्र ठरणाऱ्या महिलांना पुढील हप्ते मिळणार नाहीत.
याशिवाय, सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी KYC करणे अनिवार्य केले आहे. यासाठी आता शेवटचे अवघे काही दिवस शिल्लक आहेत. ज्या महिलांनी ठरलेल्या मुदतीत केवायसी पूर्ण केली नाही, त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे “आपण पात्र आहोत तरी पैसे का आले नाहीत?” असा प्रश्न अनेक महिलांना पडू शकतो.
थोडक्यात सांगायचे तर, पुढील महिन्यात काही महिलांचे ₹४५०० खात्यात जमा होणार नाहीत. यामध्ये दोन गट असतील – एक म्हणजे निकषाबाहेर लाभ घेतलेल्या महिला आणि दुसऱ्या म्हणजे वेळेत KYC न करणाऱ्या महिला. त्यामुळे अजूनही वेळ असताना आपल्या कागदपत्रांची पूर्तता झाली आहे का, केवायसी पूर्ण आहे का, याची खात्री करून घेणे फार गरजेचे आहे.
लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी आधार देणारी योजना आहे, पण नियम पाळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अन्यथा अचानक लाभ बंद झाल्यावर घरात अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे ही बातमी इतर महिलांपर्यंतही पोहोचवा, जेणेकरून कोणाचाही हप्ता केवळ दुर्लक्षामुळे थांबू नये.
( Disclaimer: वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही.)
2 thoughts on “महिलांची टेन्शन वाढवणारी बातमी! या महिलांना मिळणार नाहीत लाडक्या बहिणी योजनेचे ₹४५००, कारण काय?”