नोव्हेंबर–डिसेंबर चे 3,000 होणार जमा? योजनेतून लाखो महिला बाहेर? ई-KYCच ठरणार गेमचेंजर 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana Update | सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी आजची बातमी फार महत्त्वाची आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवायचा असेल तर ३१ डिसेंबर ही तारीख अगदी निर्णायक ठरणार आहे. कारण जिल्ह्यातील तब्बल तीन लाख ७७ हजार महिलांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही, आणि यामुळे त्यांचा लाभ थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या योजनेत सोलापूर जिल्ह्यातून ११ लाख ९ हजार महिलांनी अर्ज केले होते. सुरुवातीचे काही महिने सर्वांना नियमित हप्ता मिळाला. पण नंतर सरकारने निकषांनुसार तपासणी सुरू केली. संजय गांधी निराधार योजना घेणाऱ्या महिला, चारचाकी वाहनधारक, एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिला, वय २१ खाली व ६५ पेक्षा वरच्या महिला आणि शासकीय कर्मचारी यांना योजनेतून वगळण्यात आले. या प्रक्रियेत अंदाजे दोन लाख महिला थेट अपात्र ठरल्या.

आता शेवटच्या टप्प्यात ई-केवायसी केली जात आहे. यात कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे की कमी, हे स्पष्ट होणार आहे. अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार, यातही जिल्ह्यातील अंदाजे तीन लाखांहून अधिक महिला अपात्र ठरू शकतात.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी किरण जाधव यांनी सांगितले की, “सोलापूर जिल्ह्यात ६० ते ६५ टक्के महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे. उर्वरित महिलांनी ते ३१ डिसेंबरपूर्वी करणे अत्यावश्यक आहे.”

राज्यात अजूनही ८० लाख महिलांनी ई-केवायसी केलेले नाही. त्यामुळे तिसऱ्यांदा मुदत वाढू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात असला तरी, सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा नाही.

मात्र, एक गोष्ट ठाम आहे

नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता सर्वांना मिळणार.

पण फेब्रुवारीपासून केवळ ई-केवायसी केलेल्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळेल. आता परिस्थिती अशी आहे की, लाभ चालू ठेवायचा असेल तर ई-केवायसी हा पर्याय नाही… तो आवश्यकता आहे.

महिलांनी 2वेळ न दवडता ही प्रक्रिया पूर्ण केली, तरच येणाऱ्या महिन्यांत त्यांच्या खात्यातील १५०० रुपयांचा आधार अखंडित राहील. अन्यथा, या योजनेतून हजारो महिलांना बाहेर पडावे लागू शकते आणि हाच मुद्दा संपूर्ण जिल्ह्यात चिंतेचा विषय ठरत आहे.

Leave a Comment