आजपासून लाडल्या बहिणींच्या खात्यात थेट 1500 रुपये , संपूर्ण राज्यात जल्लोष! 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladli Behna 1500 Credit | मध्य प्रदेशातील लाडल्या बहिणींसाठी आजचा दिवस सोन्यासारखा उजाडला आहे. कारण 9 डिसेंबर 2025 पासून लाडली बहना योजनेचा 31 वा हप्ता थेट महिलांच्या बँक खात्यात जमा होऊ लागला आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करणाऱ्या महिलांसाठी ही मोठी आनंदवार्ता ठरली आहे. राज्यभरात महिलांनी सकाळपासूनच आपापल्या बँक खात्यांची तपासणी सुरू केली असून अनेकांच्या खात्यात 1500 रुपये जमा झाल्याचे दिसून येत आहे.

विशेष म्हणजे, हा लाभ महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना नव्हे; तर मध्य प्रदेशातील लाडल्या बहिणींना मिळत आहे. त्यामुळे एमपीमधील महिलांमध्ये समाधान आणि उत्साहाचं वातावरण आहे.

स्वतः मुख्यमंत्री मोहन यादव यांनी एक्स (X) प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत ही माहिती दिली. त्यांनी लिहिलं की, “लाडल्या बहिणींनो, 31 व्या हप्त्याचे वितरण आजपासून सुरू झाले असून तुमच्या खात्यात 1500 रुपये जमा होत आहेत.” मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर राज्यभरात महिलांचा आनंद अधिकच दुणावला आहे.

राज्यातील तब्बल 1.26 कोटी महिलांना या योजनेचा थेट फायदा मिळत आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ही योजना किती महत्त्वाची आहे, हे आकड्यांतूनच स्पष्ट दिसते. योजनेअंतर्गत सरकारने काही दिवसांपूर्वीच मोठा निर्णय घेत, हप्त्याची रक्कम 1250 रुपयांवरून थेट 1500 रुपये इतकी वाढवली आहे. म्हणजेच आता लाभार्थी महिलांना दरमहा 250 रुपयांची अतिरिक्त मदत मिळणार आहे. वाढीव निधीमुळे महिलांच्या हातात अधिक पैसा खेळणार असून घरगुती अर्थकारणाला चांगली चालना मिळेल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.

आजपर्यंत या योजनेद्वारे एमपीमधील लाडल्या बहिणींना एकूण 30 हप्ते मिळाले आहेत. आणि आता सुरू झालेला 31 वा हप्ता त्यांच्या खऱ्या अर्थाने मदतीचा श्वास ठरत आहे. नोकरी, शेती, घरकाम अशी कामांची धावपळ करत असतानाच या योजनांच्या माध्यमातून मिळणारी रक्कम त्यांना मोठा आधार ठरते.

आजचा दिवस लाडल्या बहिणींसाठी केवळ आर्थिक मदतीचा नाही तर आत्मविश्वासाचा आहे. कारण सरकारकडून मिळणारी ही मदत त्यांना स्वावलंबनाकडे नेणारी आहे. प्रशासनाने सर्व लाभार्थींना आपली बँक खाती तपासून पाहा, असे आवाहनही केले आहे.

महागाईच्या काळात प्रत्येक रुपयाला किंमत आहे. आणि अशातच 1500 रुपयांचा हा हप्ता अनेक घरांमध्ये दिवाळीच्या दिव्यासारखा उजेड पेरत आहे. योजनांचा आधार, सरकारची घोषणा आणि महिलांचा आनंद  या सगळ्यांनी आज मध्य प्रदेशात उत्साहाचे वारे वाहत आहेत.

Leave a Comment