Maharashtra New Expressway : महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे, ती म्हणजे लवकरच आता महाराष्ट्राच्या विकासाला एक मोठे चालना मिळणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र मध्ये मोठे मोठे प्रकल्प मोठे मोठे रस्ते यांचे काम जोरात चालू आहे अशातच आणखी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे यामुळे नक्कीच महाराष्ट्रामध्ये मोठा विकास होऊ शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना होणार आहे भविष्यात मोठा बदल घडणार आहे जळगाव जिल्ह्यातून आणखी एक हा नवीन राष्ट्रीय मार्ग होणार असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे. हा मार्ग कसा असू शकतो आणि याचा फायदा भविष्यात कसा होणार आहे याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. Maharashtra New Expressway
आम्हाला मिळालेल्या अपडेट नुसार, भुसावळ ते चितोडगड असा थेट राष्ट्रीय महामार्ग तयार होण्याचा प्रस्ताव आहे. आधीच जळगाव जिल्ह्यातून पाच राष्ट्रीय महामार्ग जात असताना, आता या नव्या महामार्गामुळे जिल्ह्याचं दळणवळणाचं जाळं आणखी मजबूत होणार आहे.
असा असणाऱ्या चा रूट (Route of highways in Maharashtra)
उत्तर महाराष्ट्र, विशेषतः जळगाव, भुसावळ, यावल, चोपडा परिसरातील नागरिकांसाठी हा महामार्ग म्हणजे थेट राजस्थानकडे जाणारा वेगवान रस्ता ठरणार आहे. राजस्थानमधील अजमेर, पुष्कर, चितोडगड ही पर्यटनस्थळं पाहण्यासाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात लोक जातात. तसंच राजस्थानमधून रोजगार, व्यवसाय आणि नोकरीसाठी अनेकजण महाराष्ट्रात येतात. आतापर्यंतचा प्रवास लांबचा, वेळखाऊ आणि खर्चिक होता, मात्र भुसावळ–चितोडगड या नव्या राष्ट्रीय महामार्गामुळे हा प्रवास सुकर होणार असल्याचं चित्र आहे.
या महामार्गामुळे महाराष्ट्र आणि राजस्थानमधील अंतर लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. जळगाव ते अजमेर प्रवासात मोठी बचत होणार असून, केवळ प्रवासच नाही तर व्यापार, शेतीमाल वाहतूक, उद्योग आणि पर्यटनालाही मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील केळी, कांदा, कापूस, मका यांसारखा शेतीमाल राजस्थान आणि उत्तर भारतात पोहोचवणं अधिक सोपं होणार आहे, तर राजस्थानकडून येणारा मालही जलद गतीने महाराष्ट्रात पोहोचेल.
मिळालेल्या माहितीनुसार, हा नवा राष्ट्रीय महामार्ग भुसावळ – पाल – खरगोन – धार – रतलाम – मंदसौर – निमच – चितोडगड असा असणार आहे. विशेष बाब म्हणजे भिलवाडा मार्गे हा रस्ता पुढे थेट पुष्कर आणि अजमेरलाही जोडला जाणार आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील नागरिकांचा अजमेर शरीफपर्यंतचा प्रवासही अधिक सोपा आणि कमी वेळेत होणार आहे.
या प्रकल्पामुळे भुसावळ ते चितोडगड अंतर जवळपास १५० किलोमीटरने कमी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात या महामार्गाची लांबी सुमारे ३६ किलोमीटर, तर मध्यप्रदेशात तब्बल २०१ किलोमीटर इतकी राहणार आहे. सध्या भुसावळहून चितोडगडला जाण्यासाठी प्रवाशांना बऱ्हाणपूर–इंदूर–नागदा–जावरा असा सुमारे ६०० किलोमीटरचा मार्ग किंवा यावल–चोपडा–शिरपूर–सेंदवा–रतलाम असा साडेपाचशे ते सहाशे किलोमीटरचा लांबचा प्रवास करावा लागतो.
नवा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर मात्र हा प्रवास अधिक सरळ आणि जलद होणार असून, सध्या १४ तास लागणारा प्रवास अवघ्या ९ तासांपर्यंत कमी होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे वेळ, इंधन आणि खर्च तिन्ही गोष्टींची मोठी बचत होणार आहे.
एकंदरीत पाहता, भुसावळ–चितोडगड हा नवा राष्ट्रीय महामार्ग उत्तर महाराष्ट्रासाठी गेमचेंजर ठरण्याची चिन्हं आहेत. जळगाव जिल्ह्याचा थेट राजस्थानशी मजबूत दुवा जोडला जाणार असून, उद्योग, शेती, पर्यटन आणि रोजगाराच्या नव्या संधी या रस्त्यामुळे उघडणार आहेत. उत्तर महाराष्ट्राच्या विकासात हा महामार्ग नवा अध्याय लिहिणार अशीच अपेक्षा सध्या नागरिक व्यक्त करत आहेत.