लवकरच, खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा होणार?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo Shetkari Yojana: राज्यातला शेतकरी आजही आपल्या मोबाईलवर सतत एकाच मेसेजची वाट पाहतोय Namo Shetkari Yojana चा हप्ता जमा झाला आहे. कारण पिकाचं उत्पादन अनिश्चित, बाजारभाव डळमळीत, पावसाचा लहरीपणा वेगळाच… अशा स्थितीत या योजनेतून मिळणारे काही हजार रुपयेही शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरतात. पण यावर्षी परिस्थिती काहीशी बदलली आहे. लाभार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे आणि यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संभ्रम व नाराजी वाढली आहे.

कृषी खात्याच्या ताज्या माहितीनुसार, २० व्या हप्त्यात सुमारे ९६ लाख शेतकरी होते. २१ व्या हप्त्यात ही संख्या कमी होऊन ९२-९३ लाखांवर आली. आणि आता नमो शेतकरी महासन्मान निधीचा आठवा हप्ता फक्त ९० लाख ४१ हजार २४१ शेतकऱ्यांच्याच खात्यात जमा होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. म्हणजेच लाखो शेतकरी यादीतून वगळले गेलेत, आणि त्यामागे सरकारचे नव्याने लागू केलेले कठोर निकष कारणीभूत आहेत.

वगळल्या गेलेल्यांमध्ये

• मृत लाभार्थी (सुमारे २८ हजार)

• दुहेरी लाभार्थी (सुमारे ३५ हजार)

• तसेच एका रेशन कार्डावर लाभ फक्त एका व्यक्तीलाच असा नियम असल्याने नवरा-बायको दोघांना मिळणारा लाभ थांबला

याशिवाय आयटीआर भरणारे, काही सेवा क्षेत्रात असलेले, आणि ज्यांच्याकडे नियमित उत्पन्नाचे कागद आहेत, अशा शेतकऱ्यांचे कठोर तपासणीमुळे लाभ थांबण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची संख्या पुढच्या हप्त्यात अजून कमी होऊ शकते, अशी शक्यता कर्मचाऱ्यांकडूनही व्यक्त होत आहे. Namo Shetkari Yojana

दरम्यान, गावागावात एकच चर्चा हप्ता कधी येणार? कारण निवडणुकीचा माहोल चालू आहे, ZP–Panchayat Samiti निवडणुकाही जवळ आल्या आहेत. अशा वेळी शासन कोणताही लोकप्रिय निर्णय पुढे ढकलणार नाही, असा अंदाज आहे. सूत्रांनुसार नमोचा आठवा हप्ता डिसेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो. पण अधिकृत तारखेची घोषणा अजूनही बाकी असल्यामुळे अनेक शेतकरी बँकेच्या चकरा मारतायत.

योजनेचा हप्ता मिळणार ही आनंदाची बातमी असली तरी लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने अनेक शेतकरी चिंतेत आहेत. काहींना स्वतःच कळत नाही की ते योजनेतून बाहेर का पडले. गावातील अनेक वृद्ध शेतकरी तर आमचं नाव का काढलं? आम्ही तर काडीचीही चूक केली नाही अशी उदास प्रतिक्रिया देताना दिसतात.

आता पुढचा प्रश्न फक्त एकच आठवा हप्ता कधी जमा होणार आणि पुढील निकष अजून कठोर होणार आहेत का? राज्यातील शेतकऱ्यांची नजर आता सरकारच्या पुढील घोषणेकडेच खिळून बसली आहे.

2 thoughts on “लवकरच, खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा होणार?”

Leave a Comment