नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी येणार? 4 हजार रुपयांबाबत मोठी अपडेट समोर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo Shetkari Yojana: राज्यातील शेतकरी बांधव सध्या एका महत्त्वाच्या आर्थिक मदतीकडे डोळे लावून बसले आहेत. शेतीचा वाढता खर्च, खत-बियाण्यांच्या किमती, मजुरी, कर्जाचा भार या सगळ्यांमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरली आहे. आतापर्यंत सात हप्ते मिळाल्यानंतर आता प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एकच प्रश्न आहे तो म्हणजे नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता नेमका कधी येणार?

शेतकऱ्यांची उत्सुकता वाढली, पण अफवांना थारा नको

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि गावागावात वेगवेगळ्या तारखा सांगितल्या जात आहेत. कुणी म्हणतं आज पैसे येणार, तर कुणी उद्याचा दावा करतं. मात्र शेतकरी बांधवांनी अशा अफवांवर विश्वास ठेवणं टाळणं अत्यंत गरजेचं आहे. कारण शासकीय योजनांमध्ये निधी वितरणामागे ठरावीक प्रक्रिया असते. Namo Shetkari Yojana

हप्ता खात्यात येण्याआधी सरकारला काय करावं लागतं?

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता थेट खात्यात जमा होण्याआधी काही महत्त्वाचे टप्पे पूर्ण करावे लागतात.

१) पुरवणी मागणी सादर करणे

सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे (८ डिसेंबर ते १९ डिसेंबर). या अधिवेशनातच नमो शेतकरी योजनेसाठी आवश्यक निधीची पुरवणी मागणी विधानसभेत मांडली जाते.

२) राज्यपालांची मंजुरी

पुरवणी मागणी मंजूर झाल्यानंतर निधी वितरणासाठी राज्यपालांची अधिकृत मंजुरी आवश्यक असते.

३) शासकीय निर्णय (GR) जारी होणे

राज्यपालांची मंजुरी मिळाल्यावर शासनाकडून अधिकृत GR (Government Resolution) काढला जातो. यामध्ये किती शेतकऱ्यांना, किती निधी दिला जाणार आहे याचा तपशील असतो. जोपर्यंत हा GR निघत नाही, तोपर्यंत पैसे खात्यात जमा होऊ शकत नाहीत.

नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी येणार? (Namo Shetkari 8th Installment Date)

सध्याची प्रशासकीय हालचाल आणि अधिवेशनाची वेळ पाहता,
१० ते १२ डिसेंबर दरम्यान पुरवणी मागणी सादर होण्याची शक्यता आहे.
यानंतर राज्यपालांची मंजुरी आणि GR प्रक्रिया पूर्ण झाल्यास नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता २० डिसेंबरपूर्वी कधीही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. मात्र आज-उद्या पैसे येणार, असे दावे सध्या तरी चुकीचे आहेत. कारण आत्तापर्यंत कोणताही अधिकृत GR जाहीर झालेला नाही.

शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा सल्ला

शेतकरी बांधवांनी कोणत्याही व्हॉट्सॲप फॉरवर्ड, यूट्यूब अफवा किंवा अपुष्ट बातम्यांवर विश्वास ठेवू नये. फक्त शासकीय घोषणा, अधिकृत GR आणि विश्वासार्ह बातम्या यांनाच महत्त्व द्यावे. सरकारकडून अधिकृत घोषणा होताच, नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याची अचूक तारीख स्पष्ट होईल आणि पैसे थेट खात्यात जमा होतील. थोडा संयम ठेवा… शेतकऱ्यांच्या खात्यात ४ हजार रुपये लवकरच जमा होणार आहेत.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment