Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी सध्या एकच प्रश्न सतावत आहे “नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता नेमका कधी जमा होणार?” कारण पीएम किसानचा हप्ता मिळाल्यानंतरही नमो शेतकरीचा पैसा खात्यात न आल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजी पाहायला मिळत आहे. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. तसेच पुढील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये पीएम किसानचा 22 वा हप्ता जमा होणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. मात्र पीएम किसानच्या धर्तीवर सुरू असलेल्या नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता अद्याप प्रलंबित आहे.
पीएम किसाननंतरही नमो शेतकरीचा हप्ता का थांबला?
सामान्यतः पीएम किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर १० ते १५ दिवसांच्या आत नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जातो. पण यावेळी तब्बल एक महिना उलटूनही पैसा न आल्याने अनेक शेतकरी चिंतेत आहेत. यामागचं मुख्य कारण म्हणजे राज्यात सुरू असलेल्या महापालिका निवडणुका. राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील 29 महापालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, 15 जानेवारी 2026 रोजी मतदान आणि 16 जानेवारीला निकाल लागणार आहे. यामुळे सध्या राज्यात आदर्श आचारसंहिता लागू आहे.
आचारसंहितेमुळे पैसे अडले
आदर्श आचारसंहिता लागू असताना सरकारला कोणत्याही नवीन आर्थिक लाभाच्या योजना किंवा थेट खात्यात पैसे वर्ग करता येत नाहीत. याच कारणामुळे नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता थांबवण्यात आला आहे. त्यामुळे जोपर्यंत आचारसंहिता संपत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार नाही. Namo Shetkari Yojana
नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी मिळणार?
महापालिका निवडणुकांचा निकाल 16 जानेवारी 2026 रोजी जाहीर होणार असून त्याच दिवशी आदर्श आचारसंहिता संपेल. त्यानंतर सरकारकडून या योजनेचा हप्ता वितरणाचा मार्ग मोकळा होईल. मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्याच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
शेतकऱ्यांची वाढती अपेक्षा
महागाई, खतांचे वाढते दर, कर्जाचा बोजा आणि पिकांचा खर्च पाहता नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत आहे. त्यामुळे हा हप्ता लवकरात लवकर मिळावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. आता आचारसंहिता संपल्यानंतर सरकार काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सरकारकडून अधिकृत अपडेट येताच आम्ही तुम्हाला लगेच माहिती देऊ.