१३१ किमीचा नवा रेल्वेमार्ग मंजूर! नाशिक–मुंबई प्रवासच बदलणार, ४४ गावांमध्ये भूसंपादन सुरु  संपूर्ण माहिती वाचा 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nashik Railway Update | नाशिक शहराचा वेगाने विकास होत असताना दररोज लाखो लोकांची मुंबई–नाशिक आणि पुणे–नाशिक अशी धावपळ सुरूच असते. रस्त्यांवर गर्दी, रेल्वेमार्गावर ताण… आणि याच सगळ्यामुळे पायाभूत सुविधांवर सरकारचं खास लक्ष केंद्रित झालं आहे. त्याचाच मोठा भाग म्हणजे कसारा–मनमाड या १३१ किमीच्या समांतर रेल्वेमार्गाला केंद्राकडून मिळालेली अंतिम मंजुरी. Nashik Railway Update

हा प्रकल्प केवळ रेल्वेमार्ग नाही… तर नाशिक–मुंबई प्रवासाला नवं पंख देणारा मोठा बदल ठरणार आहे. सध्या कल्याण–मनमाड दरम्यान रेल्वे मार्गावर एवढा ताण आहे की गाड्यांचं नियोजन करणं अवघड जातं. वरतून कसारा घाट… देशातील सर्वात अवघड मार्गांपैकी एक! इथे वेग कमी, देखभाल जास्त आणि विलंब नियमित. त्यामुळे या नव्या रेल्वेमार्गाची गरज वर्षानुवर्षे जाणवत होती.

शेवटी रेल्वे मंत्रालयाने निर्णय घेतला आणि केंद्राने हिरवा कंदीलही दाखवला.

४,५०० कोटींचा भव्य प्रकल्प

या नव्या मार्गासाठी तब्बल ₹४,५०० कोटी खर्च अपेक्षित आहे. मार्ग तयार झाल्यानंतर

नाशिक–मुंबई प्रवास अधिक वेगवान

मार्गावरील ताण कमी

लोकल सेवा सुरू करण्याची दारं खुली

असा प्रचंड फायदा मिळणार आहे.

यामुळे नाशिककरांना खरंच नवी क्रांती पाहायला मिळू शकते.

पहिली वंदे भारत स्लीपरही या मार्गावर धावणार!

१६० किमी वेगाने धावणारी अलिशान Vande Bharat Sleeper या मार्गावर धावेल, अशी माहिती चर्चेत आहे. म्हणजे प्रवास विमानासारखा… आणि नाशिक–मुंबई दरम्यान वेळेची मोठी बचत.

५ तालुके – ४४ गावांमध्ये भूसंपादन सुरू

या मार्गासाठी ५ तालुक्यांतील ४४ गावांमध्ये जमीन संपादन होणार आहे. तातडीच्या भूसंपादनासाठी नियमितपेक्षा तीनपट मोजणी शुल्क देण्याची तयारी रेल्वेने दाखवली आहे. म्हणजे कामाचा वेगही आधीपेक्षा अधिक राहणार आहे.

ज्या गावांत भूसंपादन होणार आहे  

इगतपुरी

माणिकखांब, नांदगाव बु., बोरटेंभे, नांदूरवैद्य

नाशिक

वंजारवाडी, लोहशिंगवे, लहवित, भगूर ग्रामीण, भगूर (MCI), संसरी, बेलतगव्हाण, विहितगाव, देवळाली, पंचक, एकलहरे, माडसांगवी, शिलापूर, ओढा, लाखलगाव, सिद्ध पिंप्री

निफाड

चितेगाव, नारायणगाव, चांदोरी, ओणे, मौजे सुकेणे, कसबे सुकेणे, पिंपळस, पिंपरी, निफाड, गीताकुंज, शिवडी, उगाव, थेटले, कोटमगाव, टाकळी विंचूर, पिंपळगाव (नि.)

चांदवड

वाकी खु., वाहेगावसाळ, काळखोडे, तळेगाव रोही, रायपूर, वडगाव पंगू, रापली

नांदगाव – मनमाड परिसर

नाशिककरांसाठी खऱ्या अर्थाने ‘रेल्वे क्रांती’

हा मार्ग तयार झाल्यावर मुंबई–नाशिक यांच्यातलं अंतर केवळ कागदोपत्री नाही तर प्रत्यक्षात कमी होणार आहे. लोकल सेवा सुरू झाली तर सामान्य प्रवाशांसाठी हा प्रकल्प जीवन बदलणारा ठरेल.

प्रवास वेगवान व्हावा, सुरक्षित व्हावा, आणि नाशिकचा विकास आणखी गती घ्यावा यासाठी घेतलेलं हे पाऊल पुढची अनेक वर्षं नाशिकच्या नावावर मोठी ओळख निर्माण करणार आहे.

1 thought on “१३१ किमीचा नवा रेल्वेमार्ग मंजूर! नाशिक–मुंबई प्रवासच बदलणार, ४४ गावांमध्ये भूसंपादन सुरु  संपूर्ण माहिती वाचा ”

Leave a Comment