पंजाब राव म्हणाले 2026 मध्ये दुष्काळ पडणार? पहा काय म्हणाले पंजाबराव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjab Dakh News : राज्यात सध्या शेतकऱ्यांमध्ये एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे २०२६ मध्ये दुष्काळ पडणार का? मागील काही वर्षांतील अनियमित पावसामुळे आणि अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे अनेक शेतकरी आधीच चिंतेत आहेत. अशातच सोशल मीडियावर आणि गावागावात २०२६ साली मोठा दुष्काळ येणार अशा चर्चा सुरू झाल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली होती. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी २०२६ मधील पावसाबाबत महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे. Panjab Dakh News

पंजाब डख यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे की, २०२६ मध्ये राज्यात दुष्काळ पडणार नाही. त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, २०२५ साली महाराष्ट्रातील अनेक भागांत सरासरीपेक्षा जास्त, काही ठिकाणी तर दुप्पट पाऊस झाला होता. त्यामुळे पुढील वर्षीही तसाच अतिवृष्टीचा पाऊस होईल, अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. मात्र, २०२६ मध्ये पाऊस कमीही नसणार आणि जास्तही नसणार, तर तो सरासरीच्या आसपास राहील, असं त्यांनी स्पष्ट केलं.

उदाहरण देताना पंजाब डख म्हणाले की, ज्या जिल्ह्यांत सरासरी ७०० मिमी पाऊस पडतो, तिथे २०२६ मध्ये साधारण तितकाच पाऊस होईल. हा पाऊस पिकांसाठी पुरेसा आणि पोषक असेल. त्यामुळे “पाणी कमी पडेल, पिकं जळतील, विहिरी कोरड्या पडतील” अशा अफवांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.

दरम्यान, जानेवारी २०२६ मधील हवामानाबाबतही त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. २८ डिसेंबर ते ३ जानेवारी या काळात राज्यात कडाक्याची थंडी जाणवेल. ग्रामीण भागात पहाटे दव आणि गारठा वाढलेला दिसून येईल. मात्र, ४ जानेवारीनंतर हवामानात बदल होण्यास सुरुवात होईल आणि राज्यात अंशतः ढगाळ वातावरण तयार होईल.

हे ढगाळ वातावरण पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, खानदेश, दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांत जाणवेल. मात्र, आभाळ जरी आले तरी राज्यात पावसाची शक्यता नाही, असंही पंजाब डख यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अचानक पावसाची भीती बाळगण्याची गरज नाही.

बदलणाऱ्या हवामानाचा पिकांवर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असून, हरभरा पिकाला फुले येण्यासाठी हे वातावरण फायदेशीर ठरेल. ऊस उगवणीसाठी आणि टरबूज, खरबूज यांसारख्या पिकांसाठीही हे हवामान पोषक राहणार आहे. विशेष म्हणजे द्राक्ष उत्पादकांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. नाशिक, धुळे, सांगली, सोलापूर या द्राक्ष पट्ट्यांमध्ये पाऊस नसल्याने द्राक्ष बागांचे नुकसान होणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

मात्र, ढगाळ वातावरणामुळे कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांवर लक्ष ठेवून योग्य ती काळजी घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. दुसरीकडे, दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेशात या काळात पावसाची शक्यता असून, तिथे हवामान वेगळं राहणार आहे.

एकूणच, २०२६ मध्ये दुष्काळ पडणार नाही, उलट सरासरी आणि पिकांसाठी उपयुक्त पावसाचे संकेत आहेत, असं सांगत पंजाब डख यांनी शेतकऱ्यांना धीर दिला आहे. हवामानात अचानक मोठा बदल झाल्यास आपण पुढील अंदाज वेळेवर जाहीर करू असं आश्वासन देत त्यांनी शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता नियोजनबद्ध शेती करण्याचं आवाहन केलं आहे.

( Disclaimer: वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही.)

हे पण वाचा | राज्याच्या वातावरणात बदल; दुपारनंतर मोठा इशारा, IMD चा अलर्ट जारी!

Leave a Comment