PM Kisan Yojana Farmer ID : शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. देशातील कोट्यवधी शेतकरी सध्या या योजनेच्या २२व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असतानाच, सरकारने एक महत्त्वाचा नवा नियम लागू केला आहे. हा नियम पाळला नाही, तर थेट पीएम किसानचे पैसे थांबू शकतात, असा इशारा देण्यात आला आहे.
२०१९ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने ही योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत अल्प व मध्यम भूधारक शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. २००० रुपयांचे तीन हप्ते थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांना २१ हप्ते मिळाले असून आता पुढील हप्त्याकडे बळीराजाचे लक्ष लागले आहे. मात्र, यापूर्वीच सरकारने एक नवीन अट लागू केली आहे. PM Kisan Yojana Farmer ID
‘हे’ ओळखपत्र नसेल तर हप्ता बंद!
आता पीएम किसान योजनेचा लाभ सुरू ठेवायचा असेल, तर फार्मर आयडी (Farmer ID) म्हणजेच शेतकरी ओळखपत्र असणं अनिवार्य करण्यात आलं आहे. ज्या शेतकऱ्यांकडे हा फार्मर आयडी नसेल, त्यांच्या पीएम किसान योजनेचे पुढील हप्ते थांबू शकतात, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
फार्मर आयडी म्हणजे शेतकऱ्याचं डिजिटल प्रोफाईल. या युनिक ओळखपत्राच्या आधारे शेतकऱ्याला कोणत्या योजना लागू होतात, किती सबसिडी मिळू शकते, कोणत्या सरकारी लाभांसाठी तो पात्र आहे, याची संपूर्ण माहिती एका ठिकाणी उपलब्ध होते. पुढील काळात शेतीशी संबंधित बहुतांश सरकारी योजना या फार्मर आयडीशी जोडल्या जाणार आहेत. फार्मर आयडी कसा डाउनलोड करायचा? (Step by Step)
शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. फार्मर आयडी काढण्याची प्रक्रिया सोपी असून ती ऑनलाइन करता येते.
सर्वप्रथम https://mhfr.agristack.gov.in/या अधिकृत शेतकरी नोंदणी पोर्टलला भेट द्या.होमपेजवर Create Account / Sign Up या पर्यायावर क्लिक करा.
तुमचा मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी टाका, OTP द्वारे खाते व्हेरिफाय करा. यानंतर Register as Farmer या पर्यायावर क्लिक करा. आधार क्रमांक, सातबारा उताऱ्यातील माहिती, जिल्हा, तालुका, गाव, गट नंबर, सर्व्हे नंबर अशी संपूर्ण माहिती भरा. आधार कार्ड, सातबारा उतारा आणि बँक खात्याचे तपशील अपलोड करा. अर्ज सबमिट केल्यानंतर मिळालेला Enrollment ID जपून ठेवा.
अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्ही तुमचा डिजिटल फार्मर आयडी कार्ड डाउनलोड करू शकता.
सरकारने फार्मर आयडी अनिवार्य का केला?
गेल्या काही काळात पीएम किसान योजनेत चुकीची नोंदणी, अपात्र लाभार्थी आणि डबल नोंदी वाढल्याचं सरकारच्या निदर्शनास आलं होतं. काही ठिकाणी एकाच व्यक्तीने वेगवेगळ्या नावाने किंवा चुकीच्या कागदपत्रांवर लाभ घेतल्याचंही समोर आलं. या सगळ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने फार्मर आयडी अनिवार्य केला आहे. फार्मर आयडीमुळे शेतकऱ्यांची अचूक ओळख पटेल, सगळी माहिती एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध राहील आणि भविष्यातील सर्व सरकारी योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं सरकारला सोपं होणार आहे.
थोडक्यात काय लक्षात ठेवाल?
– पीएम किसानचा २२वा हप्ता येण्याआधी फार्मर आयडी आवश्यक
– फार्मर आयडी नसेल तर हप्ते थांबू शकतात
– ऑनलाइन प्रक्रिया सोपी, घरबसल्या करता येते
– भविष्यातील सर्व शेती योजना या आयडीशी जोडल्या जाणार आता वेळ न दवडता प्रत्येक शेतकऱ्याने आजच फार्मर आयडी तयार करून घ्यावा, जेणेकरून पीएम किसानचे पैसे बंद होण्याची अडचण उद्भवणार नाही. ही महत्त्वाची माहिती आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा