Pm Kisan Yojana Installment Update 2026 : नवीन वर्ष सुरू होण्याआधीच महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक आणि आशेची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पुढील हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती चर्चेत आली असून, नव्या वर्षात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना थोडाफार आधार मिळणार असल्याचं चित्र आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारने 2019 मध्ये सुरू केली होती. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांचा थेट लाभ दिला जातो. हे पैसे दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. शेतीसाठी लागणारा खर्च, बी-बियाणे, खत किंवा घरखर्चासाठी हे पैसे शेतकऱ्यांना मोठा आधार देतात, हे अनेक शेतकरी स्वतः सांगतात. Pm Kisan Yojana Installment Update 2026
आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तब्बल 21 हप्ते देण्यात आले आहेत. यातील 21 वा हप्ता नोव्हेंबर महिन्यात जमा झाला होता. आता पुढील म्हणजेच 22 वा हप्ता कधी मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, 1 फेब्रुवारी 2026 पासून केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थसंकल्पानंतर लगेचच पीएम किसानचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो, असा अंदाज काही प्रसारमाध्यमांमध्ये व्यक्त केला जात आहे.
मात्र, याबाबत केंद्र सरकारकडून किंवा कृषी मंत्रालयाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. नेहमीप्रमाणे पीएम किसानचा हप्ता जाहीर होण्याआधी अधिकृत वेबसाईटवर नोटिफिकेशन जारी केलं जातं. सध्या तरी 22 व्या हप्त्याचं कोणतंही नोटिफिकेशन वेबसाईटवर दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत वेबसाईटवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे.
दुसरीकडे, पीएम किसान योजनेच्या रकमेत वाढ होण्याबाबतही चर्चा सुरू आहे. सध्या मिळणारे 6 हजार रुपये वाढवून 12 हजार रुपये करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती मध्यंतरी समोर आली होती. येत्या अर्थसंकल्पात याबाबत काही सकारात्मक निर्णय घेतला जाईल का, याकडे शेतकरी वर्ग आशेने पाहतो आहे. जर अशी वाढ झाली, तर वाढत्या महागाईच्या काळात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.
एकूणच, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पीएम किसानचा 22 वा हप्ता मिळणार का, याबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. अर्थसंकल्पानंतर चित्र स्पष्ट होणार असलं, तरी शेतकरी सध्या तरी या योजनेकडून चांगल्या निर्णयाची अपेक्षा ठेवून आहेत.
( Disclaimer : वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही, योजनेची योग्य अपडेट जाणून घेण्यासाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईटकडे लक्ष ठेवा.)
हे पण वाचा | शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! पीएम किसान योजनेची अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू; असा करा अर्ज..