पोस्ट ऑफिस ची भन्नाट योजना दर महिन्याला मिळणार 61 हजार रुपये, पण ते कसं पहा!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Scheme: प्रत्येकाच्या आयुष्यात एक टप्पा असा येतो जिथे आता पुढचं काय? हा प्रश्न सतावू लागतो. नोकरी असो, व्यवसाय असो किंवा शेती… उत्पन्न येत असतं पण भविष्यासाठी किती सुरक्षित आहे, हा विचार मनात घोळत राहतो. अशातच सरकारची एक जुनी, विश्वासार्ह आणि सुरक्षित योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पोस्ट ऑफिसची ही योजना अशी आहे की योग्य नियोजन केलं तर केवळ व्याजातूनच दर महिन्याला तब्बल ६१ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकतं आणि तेही कोणताही धोका न घेता. Post Office Scheme

पोस्ट ऑफिसची पब्लिक प्रोव्हिडंट फंड म्हणजेच PPF योजना ही मध्यमवर्गीय आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी कायमच आधारवड ठरलेली आहे. कमी उत्पन्न असो किंवा नियमित पगार, प्रत्येकजण या योजनेत थोडी-थोडी गुंतवणूक करून मोठी रक्कम उभी करू शकतो. आजही अनेक कुटुंबांमध्ये PPF मध्ये पैसे टाक हा सल्ला वडीलधाऱ्यांकडून दिला जातो कारण ही योजना पूर्णपणे सरकारी हमीची आणि सुरक्षित मानली जाते.

या योजनेची खास गोष्ट म्हणजे दीर्घकालीन गुंतवणूक. PPF खाते सुरुवातीला १५ वर्षांसाठी असतं. पण इथेच खरी संधी आहे. ही मुदत संपल्यानंतर तुम्ही ५-५ वर्षांनी खाते वाढवू शकता. म्हणजेच १५ + ५ + ५ असा फॉर्म्युला वापरून तुम्ही तब्बल २५ वर्षांपर्यंत या योजनेत गुंतवणूक करू शकता. आणि नेमकं याच दीर्घकालीन गुंतवणुकीमुळे मोठा परतावा मिळतो.

समजा तुम्ही दरवर्षी जास्तीत जास्त मर्यादा म्हणजे १.५ लाख रुपये PPF खात्यात भरले, तर पहिल्या १५ वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक २२.५ लाख रुपये होते. या काळात सध्याच्या ७.१ टक्के व्याजदरानुसार तुम्हाला सुमारे १८.१८ लाख रुपयांचं व्याज मिळतं आणि १५ वर्षांनंतर खात्यातील एकूण रक्कम चांगलीच वाढते. त्यानंतर पुढील ५ वर्षे म्हणजे २० वर्ष पूर्ण झाल्यावर खात्यात सुमारे ५७.३२ लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा होते. या टप्प्यावरही व्याजाची रक्कम जवळपास १६.६४ लाख रुपये इतकी होते.

हीच गुंतवणूक तुम्ही २५ वर्षांपर्यंत सुरू ठेवली, तर खात्यातील एकूण रक्कम सुमारे ८०.७७ लाख रुपयांपर्यंत पोहोचते. आणि जर याच काळात तुम्ही अजून काही वर्षे म्हणजे एकूण २५ वर्ष पूर्ण होईपर्यंत नियोजनबद्ध गुंतवणूक केली तर ही रक्कम थेट १.०३ कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते. हे सगळं कोणत्याही शेअर बाजाराच्या जोखमीशिवाय कोणत्याही ताणतणावाशिवाय.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे २५ वर्षांनंतर जर तुम्ही ही रक्कम तशीच PPF खात्यात ठेवली तर त्यावर व्याज मिळतच राहतं. या एकूण रकमेवरून वर्षाकाठी सुमारे ७.३१ लाख रुपयांचं व्याज मिळू शकतं. याचा साधा अर्थ असा की दर महिन्याला जवळपास ६० ते ६१ हजार रुपये केवळ व्याजातून तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात. कोणतंही काम न करता, कोणताही धोका न घेता.

या योजनेचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे करसवलत. PPF मध्ये केलेली गुंतवणूक आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत येते. म्हणजेच दरवर्षी १.५ लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक पूर्णपणे करमुक्त असते. शिवाय मॅच्युरिटीला मिळणारी रक्कम आणि त्यावरचं व्याज देखील पूर्णपणे टॅक्स फ्री असतं.

आजच्या महागाईच्या काळात निवृत्तीनंतर किंवा भविष्यासाठी स्थिर उत्पन्नाचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिसची PPF योजना ही खरोखरच एक मजबूत पर्याय ठरू शकते. थोडं शिस्तबद्ध नियोजन थोडी संयमाची वाटचाल आणि दीर्घकालीन विचार केला तर हीच योजना उद्या तुम्हाला आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे सुरक्षित बनवू शकते. म्हणूनच लवकर श्रीमंत होण्यापेक्षा सुरक्षितपणे स्थिर उत्पन्न कसं उभं करायचं याचा विचार करणाऱ्यांसाठी पोस्टाची ही योजना आजही तितकीच जबरदस्त आहे.

हे पण वाचा : पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना सुरू, आता या नागरिकांना मिळणार नाद खुळा व्याज

Leave a Comment