या दोन राशींच्या आयुष्यात होणार मोठा बदल शनीच्या कृपेने मोठी भरभराटी होणार!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rashi Future : शनी म्हटलं की गावाकडचा माणूस घाबरतोच भाऊ. कारण अनुभव सांगतो शनीच्या वेळेला पैसे हातात राहत नाहीत, नोकरीत अडथळे येतात, घरात वाद, मनात बेचैनी… आणि हाच काळ आता दोन राशींवर पुन्हा जड होणार आहे. पुढचं दीड वर्ष या दोन्ही राशींना नीट विचार करून पाऊल टाकावं लागणार आहे, असा ज्योतिषांचा स्पष्ट इशारा आहे. Rashi Future

सध्या शनि मीन राशीत भ्रमण करत आहे. मेष, कुंभ आणि मीन राशींवर त्याची साडेसाती चालूच आहे. पण त्याचबरोबर शनीच्या हालचालींमुळे सिंह आणि धनु या दोन राशींवर ‘ढैय्या’चा ताण चांगलाच वाढेल. जून २०२७ पर्यंत हा काळ सुरू राहणार आहे. या काळात शनि कधी वक्री, कधी थेट, तर कधी नक्षत्र बदलत असल्याने जीवनात चढ-उतार वेगाने दिसू शकतात.

शनी ढैय्या म्हणजे साधारण साडेसातीपेक्षा कमी पण तितकाच कडक काळ. मनावर भार, खर्चात वाढ, नोकरी-व्यवसायात धक्के, घरात तणाव… हे सगळं या काळात जाणवतं. म्हणूनच या दोन्ही राशींनी जरा जास्त सावध राहणं आवश्यक आहे.

सिंह राशी : मेहनत जास्त, फायदा कमी; खर्चाचे सावट

सिंह राशीच्या लोकांना पुढचे महिने जरा अवघड जातील. काम करतात ते मनापासून करतात, पण परिणाम उशिरा दिसतील. व्यवसायात थांबलेले फायदे, नोकरीत अनपेक्षित अडथळे, आणि वरून खर्च वाढेल. कधी पैशांची धडपड, तर कधी कोणत्या गोष्टीचं श्रेय मिळणार नाही असंही होईल. तरीही या काळात त्यांना समाजात आदर मिळत राहील फक्त संयम ठेवावा लागेल. कोणतंही पाऊल उचलताना दहा वेळा विचार करणंच उत्तम.

धनु राशी – मानसिक ताण, शरीराची घसरण आणि पैशात चढ-उतार

धनु राशीवर २०२६ पासून थेट जून २०२७ पर्यंत शनीची कडक नजर राहणार आहे. मनावर ताण वाढेल, कामात व्यत्यय येतील, आज केलेलं उद्या पाडावं लागेल अशा घटना वाढू शकतात. पैशात चढ-उतार, उधळपट्टी, अनपेक्षित खर्च हे सगळं जाणवेल. आरोग्याबाबतही निष्काळजीपणा चालणार नाही. एखादं जुनं दुखणं पुन्हा डोकं वर काढू शकतं. पण चांगली गोष्ट म्हणजे हा काळ संपला की मोठा बदल, मोठं यश, आणि चांगला फायदा दिसतो.

या राशींनी काय करावं? ज्योतिषांचा सल्ला

ज्योतिष मानत असाल तर शनीच्या काळात काही गोष्टी

मनाला आधार देतात

– हनुमानाची पूजा

– रोज किंवा आठवड्यातून एकदा हनुमान चालीसा

– शनीवारी साधी पूजा किंवा दीपा

यामुळे मन स्थिर राहते, आत्मविश्वास वाढतो आणि अडचणींवर पेलून जाण्याची शक्ती मिळते.

हे पण वाचा | Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त व्याजातून दर महिन्याला मिळणार ६१,००० रुपये

1 thought on “या दोन राशींच्या आयुष्यात होणार मोठा बदल शनीच्या कृपेने मोठी भरभराटी होणार!”

Leave a Comment