आरबीआयची या बँकेवरती मोठी कारवाई! तुमचे तर खाते नाही ना या बँकेमध्ये?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RBI BANK NEWS: देशातील बँकिंग व्यवस्थेवर कडक नजर ठेवणाऱ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नियम मोडणाऱ्यांवर कोणतीही तडजोड नाही, असा थेट संदेश देत आरबीआयने नामांकित खासगी बँक असलेल्या कोटक महिंद्रा बँकेवर मोठी कारवाई केली आहे. बँकिंग नियमांचं पालन करण्यात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी कोटक महिंद्रा बँकेला तब्बल 61.95 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून ही कारवाई सध्या बँकिंग क्षेत्रात चर्चेचा विषय ठरली आहे. RBI BANK NEWS

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करत ही माहिती दिली आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, कोटक महिंद्रा बँकेने ‘Access to Banking Services – Basic Savings Bank Deposit Account (BSBDA)’ संदर्भातील नियम, बिझनेस कॉरस्पॉन्डंट्सशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे तसेच ‘Credit Information Companies Rules, 2006’ यांचे योग्य पालन केले नाही. याच कारणांमुळे 11 डिसेंबर रोजीच्या आदेशानुसार बँकेवर जवळपास 62 लाख रुपयांचा आर्थिक दंड लादण्यात आला आहे.

आरबीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, 31 मार्च 2024 रोजी बँकेच्या आर्थिक स्थितीचं वैधानिक पर्यवेक्षण आणि मूल्यांकन करण्यात आलं होतं. या तपासणीदरम्यान काही गंभीर त्रुटी आरबीआयच्या निदर्शनास आल्या. विशेष म्हणजे, कोटक महिंद्रा बँकेने अशा ग्राहकांची ‘Basic Savings Bank Deposit Account’ प्रकारातील खाती उघडली होती, ज्यांच्याकडे आधीच इतर बँक खाती अस्तित्वात होती. हे थेट नियमांचं उल्लंघन असल्याचं आरबीआयने स्पष्ट केलं आहे.

इतकंच नाही, तर बँकेने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक कामं बिझनेस कॉरस्पॉन्डंट्सकडून करून घेतल्याचंही समोर आलं आहे. याशिवाय काही कर्जदारांची माहिती चुकीच्या पद्धतीने क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्यांना पाठवण्यात आली होती. ही बाबही नियमबाह्य असल्याचं आरबीआयने नमूद केलं आहे.

या संपूर्ण प्रकरणी आरबीआयने कोटक महिंद्रा बँकेला आधी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. बँकेकडून आलेल्या उत्तरांचा आणि स्पष्टीकरणांचा सखोल अभ्यास केल्यानंतर आरबीआयला आरोप खरे असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतरच ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. कोटक महिंद्रा बँकेनेही स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या फायलिंगमध्ये या कारवाईची माहिती दिली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, या कारवाईचा थेट परिणाम बँकेच्या ग्राहकांवर होणार नाही, असं आरबीआयने स्पष्ट केलं आहे. ग्राहकांच्या खात्यांवर, व्यवहारांवर किंवा सेवांवर कोणताही परिणाम होणार नसल्याने ग्राहकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही, असंही आरबीआयनं सांगितलं आहे.

दरम्यान, या कारवाईनंतर कोटक महिंद्रा बँकेच्या शेअरकडे गुंतवणूकदारांचं लक्ष लागलं आहे. शुक्रवारी शेअर बाजार बंद होताना बँकेच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली होती. सध्या कोटक महिंद्रा बँकेचा शेअर सुमारे 2159 रुपयांच्या आसपास असून बँकेचं बाजारमूल्य 4.29 लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. विशेष म्हणजे, गेल्या एक वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना जवळपास 24 टक्के रिटर्न दिला आहे. मात्र आरबीआयच्या या कारवाईनंतर सोमवारी बाजारात शेअरची पुढची दिशा काय असेल, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. एकंदरीत पाहता, आरबीआयने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की बँकिंग क्षेत्रात नियम मोडले गेले, तर कारवाई अटळ आहे मग ती बँक कितीही मोठी किंवा नामांकित असो.

हे पण वाचा | RBI New Rule: आरबीआयचा बँक खातेधारकांसाठी दोन मोठे नवीन नियम लागू! त्याचा फायदा होणार का तोटा पहा!

1 thought on “आरबीआयची या बँकेवरती मोठी कारवाई! तुमचे तर खाते नाही ना या बँकेमध्ये?”

Leave a Comment