राज्यातील शेतकऱ्यांना या दिवशी मिळणार कर्जमाफी? कृषिमंत्री यांची मोठी घोषणा वाचा सविस्तर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Shetkari krajmafi : राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अखेर दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या कर्जमाफीची चर्चा गावोगाव सुरू होती, शेतकऱ्यांच्या बैठकीत, चहाच्या टपरीवर, बाजारात ज्यावर सतत चर्चा होत होती, ती कर्जमाफी आता प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने मोठं पाऊल पुढे टाकलं गेलं आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी, निसर्गाच्या माराने हैराण झालेली शेती आणि बाजारात मिळणारे अपुरे दर या सगळ्यात शेतकरी हतबल झाला असताना, ही घोषणा त्याच्यासाठी मोठा आधार ठरणारी आहे. Shetkari krajmafi

खरं तर 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीने सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं होतं. सरकार स्थापन झाल्यानंतर काही महिने उलटून गेले, मात्र कर्जमाफीबाबत ठोस घोषणा होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत होती. अनेक शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्या, आंदोलनं झाली, सरकारवर दबाव वाढला. अशा परिस्थितीत आता कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी थेट कर्जमाफीची अधिकृत तारीख जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा आशेचं वातावरण निर्माण झालं आहे.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, 30 जून 2026 पूर्वी राज्यातील पात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ दिला जाईल. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती देत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. त्यांनी म्हटलं की, शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि त्याच्या पाठीशी उभं राहणं ही सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे कर्जमाफीबाबत सरकार कोणतीही चालढकल करणार नाही, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.

या कर्जमाफीसाठी सरकारने विशेष समिती स्थापन केली असून, या समितीचा सविस्तर अहवाल एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सरकारकडे सादर होणार आहे. या अहवालाच्या आधारे पात्रतेचे निकष, कर्जाची मर्यादा आणि अंमलबजावणीची प्रक्रिया अंतिम केली जाईल. जून 2026 संपण्याआधी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचा लाभ पोहोचवण्याचं सरकारचं नियोजन असल्याचंही कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

गेल्या काही वर्षांपासून सततचा दुष्काळ अतिवृष्टी अवकाळी पाऊस, वाढता खत-बियाण्यांचा खर्च आणि बाजारात मिळणारे कमी दर यामुळे शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकत गेला. अनेक शेतकऱ्यांना जुने कर्ज फेडण्यासाठी नवं कर्ज घ्यावं लागलं. याच पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्यासह अनेक शेतकरी संघटनांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. या आंदोलनांमुळे सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं. आता कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या अधिकृत घोषणेमुळे त्या आश्वासनाला प्रत्यक्ष

अंमलबजावणीची दिशा मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे. कर्जमाफीची रक्कम नेमकी किती लाखांपर्यंत असेल, याबाबत अंतिम निर्णय लवकरच जाहीर केला जाणार असून, प्राथमिक स्तरावर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल, असे संकेत मिळत आहेत.

या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, ग्रामीण भागातील अर्थचक्र पुन्हा गती घेईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता शेतकऱ्यांचं लक्ष एकाच गोष्टीकडे लागलं आहे, ते म्हणजे सरकार या घोषणेची अंमलबजावणी किती वेगाने आणि पारदर्शकपणे करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Comment