Soybean Market Price : राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज समोर आलेले आहे. आजचा दिवस खरच तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे कारण गेल्या काही दिवसांपासून ज्या गोष्टीची तुम्ही वाट पाहत होतात तीच बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे बाजार भाव बाबत खरंच गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांवरती खूप वाईट संकट आलं होतं, एकतर निसर्ग साथ देत नाही आणि दुसरी म्हणजे बाजार भाव शेतकऱ्यांनी कसे बस पिकवलेला पिक देखील योग्य निर्णय मिळवल्यामुळे आर्थिक संकटांमध्ये शेतकरी सापडतो. सध्या विदर्भात दरामध्ये वाढ झाली असून यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव बाजार समिती मध्ये सोयाबीनला थेट पाच हजार दोनशे रुपये इतका दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक वातावरण निर्माण झाले आहे. Soybean Market Price
खर तर साहेबान उत्पादक शेतकऱ्यांसाठी हात दिलासाच मानावा लागेल कारण गेले काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी योग्य दर मिळतच नव्हते आता दर चांगले वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक वातावरण निर्माण झाले आहे तर याच बाजार समितीमध्ये चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला 5240 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे आणि सर्वसाधारण चार हजार सहाशे च्या पुढे दर गेला आहे. तर बाबुळगाव बाजार समिती सोबतच सोलापूर बाजारात देखील पाच हजार शंभर रुपये पर्यंत जर पोहोचला आहे तर नागपूर बाजारात देखील 5000 चा टप्पा गाठला आहे. म्हणजेच आज राज्यात काही ठराविक बाजारांमध्ये 5000 च्या वर भाव मिळाल्याचे स्पष्ट चित्र आहे.
दुसरीकडे, आवकेचाही जोर कायम आहे. खानदेशातील जळगाव बाजार समितीत आज सोयाबीनची सर्वाधिक आवक नोंदवण्यात आली. तब्बल 2,125 क्विंटल आवक झाली. मात्र, इतकी मोठी आवक असूनही जळगाव मध्ये दर दबावत राहिले आणि भाव साधारण तीन हजार तीनशे रुपये आसपास गेले आहे. त्यामुळे केवळ जास्तीत जास्त आवक असली तरी तर चांगली मिळाल्याचं चित्र येथे पाहायला मिळत नाही.
तर वडवणी, तुळजापूर आणि हिंगोली सारख्या बाजारांमध्ये ही आज आवक चांगली राहिली. वडवणी बाजारामध्ये 1,470 क्विंटल आवक झाली आणि दर चार हजार 700 रुपयांपर्यंत स्थिर राहिले. तुळजापूर मध्ये मात्र आवक मर्यादित असली तरी थेट 4,850 रुपय असा दर मिळाला. हिंगोली जिल्ह्यांमध्ये विविध बाजारांमध्ये 4650 ते 4900 रुपयांच्या दरम्यान व्यवहार झाले.
आजचा बाजाराचा एकूण कल पाहता, बाबुळगाव, सोलापूर आणि नागपूर ही बाजारपेठ शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरली आहे तिथे मालाचे गुणवत्ता चांगले आहे तिथे व्यापाऱ्यांकडून चांगली बोली लावत असल्याचे चित्र पाहायला मिळाला आहे तसेच दुसरीकडे चंद्रपूर अमरावती आणि मराठवाड्यातील काही बाजारांमध्ये 4600 ते 4804 आसपास दर पाहायला मिळाले आहेत.
सध्या शेतकऱ्यांमधून एकच चर्चा आहे भावा अजून वाढणार का? परंतु बाजारातील तज्ञांच्या मते पुढील काही दिवसात आवक झाली तर चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला 5200 च्या आसपास दर मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र एकदम सगळा माल विकण्याऐवजी जर शेतकऱ्याने थोडा थोडा करून विकला तर भाव कमी जास्त मिळू शकतो.
हे पण वाचा | सोयाबीन बाजार भाव झाला मोठा बदल; आजचा सोयाबीन बाजार भाव पहा