टाटा सिएराची पूर्ण किंमत लिस्ट आउट! Adventure व्हेरियंटमध्ये मिळतात भन्नाट फीचर्स 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tata Sierra 2025 | टाटा मोटर्सने शेवटी बहुप्रतिक्षित सिएरा एसयूव्हीच्या Smart+, Pure आणि Adventure या व्हेरियंट्सची संपूर्ण किंमत जाहीर केली आहे आणि आता बाजारात खऱ्या अर्थाने खळबळ उडाली आहे. महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ही घोषणा झाल्याने गाडीस शोधात असलेल्या हजारो कुटुंबांना आता योग्य पर्याय निवडणं खूपच सोपं झालं आहे. आधी केवळ बेस Smart+ व्हेरियंटची किंमत समोर आली होती, पण आता पूर्ण लिस्ट जाहीर झाल्याने ग्राहकांचा संभ्रम दूर झाला आहे.

गावातल्या, शहरातल्या, रोजच्या वापरातील, लांबच्या प्रवासावर जाणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्या बजेटनुसार पर्याय उपलब्ध असावेत यासाठी तीन दमदार इंजिन देण्यात आले आहेत – १.५-लीटर NA पेट्रोल, १.५-लीटर टर्बो-पेट्रोल आणि १.५-लीटर डिझेल. यासोबत ६-स्पीड MT, ७-स्पीड DCT आणि ६-स्पीड AT अशा ट्रान्समिशनचीही उत्तम जोड मिळते. म्हणजे आपल्या गरजेनुसार परफॉर्मन्स निवडायची मुभा.

Smart+ व्हेरियंट हे सिएराचं बेस मॉडेल असलं तरी या गाडीत कुठेही “बेस” असं वाटत नाही. ₹११.४९ लाखांपासून सुरू होणारं हे व्हेरियंट पेट्रोल MT मध्ये उपलब्ध असून डिझेल MT ची किंमत ₹१२.९९ लाख आहे. एलईडी DRLs, टेल-लॅम्प्स, चारही चाकांवर डिस्क ब्रेक्स, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक – म्हणजे सुरक्षा आणि लूक दोन्हीचा योग्य मेळ.

यानंतर येते Pure सीरिज. नाव जरी ‘Pure’ असलं तरी फीचर्स खूपच प्रीमियम. या व्हेरियंटची सुरुवात ₹१२.९९ लाखांपासून NA पेट्रोल MT ने होते. पेट्रोल DCT, डिझेल MT आणि डिझेल AT असे पर्यायही दिले आहेत. पॅनोरॅमिक सनरूफ, १०.२५-इंच टचस्क्रीन, क्रूझ कंट्रोल, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल– हे फीचर्स पाहून कोणालाही “हीच गाडी घ्यायची!” असं वाटेल. Pure+ मध्ये तर आणखी पर्याय आणि ₹१७.४९ लाखांपर्यंत किंमत जाते.

सर्वात वरचा, दमदार, साहसी लोकांसाठी बनलेला व्हेरियंट म्हणजे Adventure. याची सुरुवात ₹१५.२९ लाखांपासून होते. पेट्रोल DCA, डिझेल MT, मोठं डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, टेरेन मोड्स, १८-इंच अलॉय व्हील्स आणि ३६०-डिग्री कॅमेरा – म्हणजे ही गाडी फक्त चालत नाही… तर रस्ता जिंकते. Adventure+ मध्ये टॉप-स्पेक डिझेल AT ची किंमत थेट ₹१८.४९ लाखपर्यंत जाते.

गेल्या काही दिवसांत SUV मार्केट प्रचंड तापलेलं आहे. पण टाटाने सिएराच्या पुनरागमनाने पुन्हा एकदा भारतीय ग्राहकांच्या भावना ओळखल्या आहेत. एकेकाळी गावातल्या-शहरातल्या रस्त्यांवर धडाक्यात दिसणारी सिएरा आता नव्या रूपात, नव्या दमात आणि नव्या तंत्रज्ञानासह समोर आली आहे.

Leave a Comment