Today’s Horoscope: आजचा दिवस म्हणजे २२ डिसेंबर, सोमवार. सोमवार हा भगवान शंकराचा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी, चंद्राचे मकर राशीत झालेले गोचर आणि उत्तराषाढा नक्षत्रात निर्माण झालेला ध्रुव योग या सगळ्या ग्रहस्थितींमुळे आजचा दिवस काही राशींसाठी विशेष भाग्यकारक ठरणार आहे. आज सुमयोग आणि वसुमान योग एकत्र आल्यामुळे नशिबाला चालना मिळणार आहे. विशेष म्हणजे, काही लोकांना अचानक पैशाचा लाभ, अडकलेली कामं पूर्ण होणं, तर काहींना घरात आनंदाची बातमी मिळण्याचा योग आहे. भगवान शंकराच्या कृपेने आज कोणत्या ५ राशींचं नशीब उजळणार आहे, चला सविस्तर जाणून घेऊया.
मेष राशी – नशिबाची दारं उघडणारा सोमवार
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मनाला समाधान देणारा ठरणार आहे. बऱ्याच दिवसांपासून जी कामं अडकली होती, ती आज मार्गी लागण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून कौतुक मिळेल, तर काहींना उत्पन्नवाढीची बातमी कानी पडू शकते. घरात वडीलधाऱ्या व्यक्तींकडून मोलाचं मार्गदर्शन मिळेल. पैतृक संपत्तीतून लाभ होण्याचीही शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस विश्वास वाढवणारा ठरेल. एकंदरीत, आज नशिब तुमच्या बाजूने उभं आहे.
कर्क राशी – प्रेम, पैसा आणि समाधान तिन्ही मिळणार
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा सोमवार सुखद अनुभव देणारा आहे. भागीदारीतून फायदा होण्याची चिन्हं आहेत. नोकरीत सहकाऱ्यांशी नातं अधिक घट्ट होईल. विशेष म्हणजे, विरुद्ध लिंगी सहकाऱ्यांकडून अपेक्षेपेक्षा जास्त सहकार्य मिळू शकतं. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी आजचा दिवस खास आहे. जुन्या ओळखीची भेट मन प्रसन्न करेल. काहींना वाहन खरेदीचा किंवा वाहनसुखाचा योग आहे. घरात सकारात्मक वातावरण राहील.
तूळ राशी – यश, प्रसिद्धी आणि इच्छा पूर्तीचा दिवस
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस यशाची चव चाखायला लावणारा ठरेल. समाजात मान-सन्मान वाढेल. मित्रमंडळींचा पाठिंबा मिळेल. कामाच्या ठिकाणी परिस्थिती तुमच्या बाजूने असल्याने कामे सहज पूर्ण होतील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. जी एखादी इच्छा मनात होती, ती आज पूर्ण होण्याची चिन्हं आहेत. कामानिमित्त प्रवास होऊ शकतो आणि तो प्रवास फायदेशीर ठरेल. सरकारी कामात अडचणी कमी होतील.
धनु राशी – अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या दिलासा देणारा आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर आज योग्य निर्णय घेता येईल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मनावरील ओझं कमी होईल.व्यवसायात एखादी रखडलेली डील आज फायनल होऊ शकते. मित्र आणि नातेवाइकांकडून सहकार्य मिळेल. विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठीही आजचा दिवस सकारात्मक संकेत देणारा आहे.
मकर राशी – चंद्र गोचरामुळे मनोबल वाढणार
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष भाग्यशाली ठरणार आहे. चंद्र तुमच्या राशीत असल्यामुळे आत्मविश्वास आणि मनोबल दोन्ही वाढलेलं जाणवेल. अपेक्षेपेक्षा जास्त लाभ मिळू शकतो.कामाच्या ठिकाणी यश मिळाल्यामुळे समाधान मिळेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाठिंबा लाभेल. वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल, तर प्रेमसंबंधात असलेल्यांना जोडीदारासोबत खास वेळ घालवण्याची संधी मिळेल. काहींना संततीकडून आनंदाची बातमी मिळू शकते.
भगवान शंकराचा सोमवार हा केवळ ग्रह-नक्षत्रांचा खेळ नाही, तर श्रद्धा, संयम आणि सकारात्मक विचारांचा दिवस आहे. आज नशिबाची साथ मिळाली, तरी नम्रता आणि कृतज्ञता ठेवली, तर लाभ टिकून राहतो. हर हर महादेव म्हणत आजचा दिवस शांत मनाने घालवा नशिब आपोआप साथ देईल. Today’s Horoscope
(Disclaimer : वरील माहिती ही ज्योतिषशास्त्रावर आधारित असून केवळ वाचकांच्या माहितीसाठी दिली आहे. प्रत्यक्ष निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)