UIDAI New Update 2026 | आजच्या काळात ‘आधार’ कार्डाशिवाय आपलं पानही हलत नाही. बँकेत खातं उघडायचं असो किंवा सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असो, आधार कार्ड हा आता केवळ ओळखीचा पुरावा राहिला नसून आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. मात्र, आजही आपल्यापैकी अनेकांकडे ते जुनं कागदी आधार कार्ड आहे, जे कधी पावसात भिजतं तर कधी पाकिटात ठेवून फाटतं. याच समस्येवर आता भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) एक जबरदस्त तोडगा काढला आहे, पण त्यासाठी आता तुम्हाला आधीपेक्षा थोडे जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
एटीएमसारखं कडक आधार कार्ड पाहिलंय का?
तुम्ही तुमचं एटीएम किंवा क्रेडिट कार्ड जसं वर्षानुवर्षं वापरता, तसंच आता आधार कार्डही प्लास्टिक स्वरूपात मिळणार आहे. याला ‘PVC आधार कार्ड’ म्हणतात. हे कार्ड दिसायला तर स्टायलिश आहेच, पण ते पाण्याने खराब होत नाही की फाटत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, यात होलोग्राम आणि सुरक्षित क्यूआर कोडसारखे फीचर्स आहेत, ज्यामुळे तुमच्या आधारचा गैरवापर होणं अशक्य आहे.
खिशाला बसणार झळ; शुल्कात झाले बदल!
जर तुम्ही आधार केंद्रावर जाऊन काही बदल करणार असाल, तर आता खिसा थोडा जास्त रिकामा करावा लागेल. सरकारने आधार सेवांच्या शुल्कात वाढ केली आहे:
नाव किंवा पत्ता बदलणे: आधार केंद्रावर आता ५० ऐवजी ७५ रुपये लागतील.
फोटो अपडेट: स्वतःचा फोटो बदलायचा असेल, तर आता थेट १२५ रुपये मोजावे लागतील.
साधे कार्ड: पुन्हा कागदी कार्ड काढायचं असेल, तर ४० रुपये लागतील. (एक आनंदाची बातमी म्हणजे, ऑनलाइन पद्धतीने स्वतः पत्ता बदलण्याची सोय १४ जून २०२६ पर्यंत मोफत ठेवण्यात आली आहे.)
घरबसल्या कसं मागवायचं हे ‘स्मार्ट’ कार्ड?
तुम्हाला आधार केंद्रावर रांगेत उभं राहण्याची अजिबात गरज नाही. मोबाईलवरून फक्त ५ मिनिटांत तुम्ही हे कार्ड ऑर्डर करू शकता.
१. UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जा आणि ‘Order Aadhaar PVC Card’ वर क्लिक करा.
२. तुमचा आधार नंबर टाका आणि मोबाईलवर आलेला ओटीपी भरा.
३. फक्त ५० रुपये (स्पीड पोस्टासह) ऑनलाइन पेमेंट करा.
४. काही दिवसांतच हे चकचकीत प्लास्टिक कार्ड तुमच्या घराच्या पत्त्यावर पोस्टमन आणून देईल.